चिमठाणे- शिंदखेडा मतदारसंघांतील जनता शोषित आहे. सर्वसामान्य महाविकास आघाडीचे प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांविरोधात पोलिस प्रशासनास हाताशी धरून खोटे गुन्हे दाखल करण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे जनतेला सोबत घेऊन जनआंदोलन उभारण्यात येईल, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे प्रदेश सरचिटणीस संदीप बेडसे यांनी शिंदखेडा येथील राष्ट्रवादी काँग्रेसच्या जनसंपर्क कार्यालयात मंगळवारी (ता.३) झालेल्या पत्रकार परिषदेत दिली.