धरणगाव- प्लास्टिकच्या वाढत्या प्रदूषणामुळे अनेक समस्या उद्भवत असतात. त्यामुळे येथील पालिकेतर्फे लोकसहभागातून राबविण्यात येणाऱ्या ‘बर्तन बँक’ उपक्रमाचा शहरवासीयांना जास्तीत लाभ घ्यावा. विवाह, धार्मिक सोहळ्यांसह सामाजिक कार्यक्रमांमध्ये प्लास्टिकच्या पत्रावळी व ग्लासचा वापर न करता, ‘बर्तन बॅंक’मधील स्टीलची भांडी वापरावीत. जेणेकरुन वाढते प्लास्टिक प्रदूषण रोखण्यात हातभार लागेल, असे प्रतिपादन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले.