बोरद ते वेळावद रस्त्याची दुरवस्था; मागील 10 वर्षात 5 वेळा भूमिपूजन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

bad condition of Road

बोरद ते वेळावद रस्त्याची दुरवस्था; मागील 10 वर्षात 5 वेळा भूमिपूजन

तळोदा (जि. नंदुरबार) : बोरद ते वेळावद दरम्यान असलेल्या चार किलोमीटर रस्त्याची दुरवस्था (Bad Condition of Road) झाली असून, या रस्त्यावर ठिकठिकाणी लहान - मोठे खड्डे (potholes) पडले आहेत. त्यामुळे वाहनधारकांना व सर्वसामान्य नागरिकांना याचा प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. (Poor condition of road from Borad to Velavad Nandurbar News)

बोरद ते वेळावद रस्ता ४ किलोमीटर अंतराचा आहे. मात्र या रस्त्याची अवस्था दयनीय झाली आहे. रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडले असल्याने याठिकाणी लहान - मोठे अपघातही घडले आहेत. वाहनधारकांना या रस्त्यावरून वाहन चालवताना तारेवरची कसरत करावी लागते. या रस्त्यावरून कुढावद, जावदा, वाडी पुनर्वसन, वेळावद व तुळाजा आदी गावातील जनतेची नेहमीच मोठ्या प्रमाणावर वर्दळ असते. तसेच शेतकरी देखील आपल्या शेतीच्या कामासाठी शेतात येण्या - जाण्यासाठी या रस्त्याच्या वापर करतात. मात्र पावसाळ्यात तर शेतकऱ्यांना असंख्य अडचणींना तोंड द्यावे लागते, रस्त्याच्या दुरवस्थामुळे शेतकऱ्यांना शेतात जाणे मुश्कील होते. तसेच शेतातून केळी, पपई अथवा इतर पिके काढताना ट्रक किंवा ट्रॅक्टर पलटी होण्याच्या घटना नेहमी घडत असतात. तर काही वेळा पावसाळ्यात वाहने गाळात रुतून बसण्याचा घटना देखील घडतात.

हेही वाचा: Jalgaon : अल्पवयीन मुलाचे अपहरण

पावसाळ्यात दहा किमीचा फेरा
दरम्यान या रस्त्यावर एक नाला असून पावसाळ्यात त्याला पूर येतो. त्यामुळे साधारणतः चार महिने हा रस्ता वाहतुकीसाठी बंदच असतो. रस्ता बंद असल्यामुळे जावदा, कुढावद, तुळाजा, वाडीपुनर्वसन आदी गावातील ग्रामस्थांना बोरद येथे येण्या जाण्यासाठी कलमाडी मार्गे दहा किलोमीटर जास्त अंतर कापावे लागते. त्यामुळे ग्रामस्थांना नाहक आर्थिक भुर्दंड बसतो. तसेच गेल्या अनेक वर्षापासून चांगल्या रस्त्याअभावी तळोदा - तुळाजा ही एसटीची फेरी बंद आहे.

हेही वाचा: Jalgaon : अधिकाऱ्यासह कर्मचाऱ्यांनी वाढदिवशी गाण्यावर धरला ठेका

पावसाळ्यापूर्वी रस्त्याचे करावे काम
बोरद ते वेळावद हे अंतर साधारणपणे ४ किमी असून या रस्त्याचे मागील दहा वर्षात पाच वेळा भूमिपूजन झाले आहे. मात्र आजपर्यंत रस्त्याचा कामाला सुरवात झालेली नाही. निवडणुक आल्या की लोकप्रतिनिधी याठिकाणी येतात व ग्रामीण जनतेला डोळ्यासमोर ठेवून या रस्त्याचे भूमिपूजन करतात. आणि ग्रामस्थांच्या डोळ्यात धूळफेक करीत वेळ मारून नेतात असे नागरिकांमधून बोलले जात आहे. पावसाळा सुरू होण्याआधी रस्त्याचे काम करावे अशी गावातील ग्रामस्थांची मागणी आहे.

Web Title: Poor Condition Of Road From Borad To Velavad Nandurbar News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top