प्रधानमंत्री कुसुम योजना; सौरऊर्जेच्या विजेतून पैसे कमवा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

 सौरऊर्जेच्या विजेतून पैसे कमवा

प्रधानमंत्री कुसुम योजना; सौरऊर्जेच्या विजेतून पैसे कमवा

शिरपूर जैन : नापीक आणि अकृषक जमिनीचा वापर करून शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्याच्या उद्देशाने केंद्र शासनाद्वारे प्रधानमंत्री कुसूम योजना सुरू करण्यात आली आहे. शेतीला पाण्याची सोय व्हावी हा यामागचा हेतू आहे. या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना विजेपासून चांगले उत्पन्न मिळवण्याची संधी उपलब्ध होणार आहे.

या योजनेद्वारे सौर ऊर्जा प्रकल्पामध्ये निर्माण होणाऱ्या वीज प्रकल्पासाठी जमीन भाडेपट्टीवर देऊन उत्पन्न मिळवण्याची संधी शेतकऱ्यांना मिळणार आहे. त्यामुळे योजनेचा तर लाभ घ्या शिवाय उत्पन्नही मिळवा, अशी ही शेतकऱ्यांना नवसंजीवनी देणारी योजना आहे. आजही अनेक भागात विद्युत पंपाची सोय झालेली नाही. त्यामुळे जमीन क्षेत्र हे पडीक आहे. आता सौर पंपाची उभारणी करून पाण्याचा प्रश्न तर मार्गी लागणार आहे पण, सौरपंप उभारून शेतकरी विजेची विक्री करून चांगले रुपये कमविण्याची संधी शेतकऱ्यांना मिळणार आहे.

हेही वाचा: नाशिक : भाजपकडून निवडणुकीसाठी सत्तेचे विकेंद्रीकरण

यांना प्रकल्प उभारण्यासाठी प्राधान्य

या योजनेअंतर्गत पॉईंट ०.५ ते २ मेगावॉट क्षमतेचे विकेंद्रीकृत सौर ऊर्जा प्रकल्प प्राधान्याने शेतकरी, शेतकरी सहकारी संस्था, पंचायत, शेतकरी उत्पादक संस्था (एफबीओ) आणि पाणी वापर कर्ता संघटना(डब्ल्यूयूए) विकसित करू शकतात. जर सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्यासाठी आवश्यक सहभागाची व्यवस्था करण्यास सक्षम नसल्यास ते सौर ऊर्जा प्रकल्प विकसित करण्याचा पर्याय निवडू शकणार आहेत. अशा परिस्थितीत भाडेपट्टी कराराद्वारे जमीन मालकाला त्यांच्या जमिनीचे भाडे मिळणार आहे.

हे प्रकल्प जमिनीवरील सौर प्रकल्पाची उभारणी स्टीलट रचना वापरूनही उभारता येईल. जेणेकरून शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनीचा वापर पिकांच्या लागवडीकरिता होऊ शकेल. या योजनेत शेतकरी त्यांच्या बँक खात्यामध्ये विकासकाद्वारे जमिनीचे मिळणारे भाडे हे महावितरण मार्फत जमा करण्याचा पर्याय निवडू शकतील. हा सौर ऊर्जा प्रकल्प महावितरणच्या जवळपास ३३/११ उपकेंद्राशी थेट जोडला जाईल.

Web Title: Pradhan Mantri Kusum Yojana Make Money From Solar Energy Winners

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top