Nandurbar MSCB News : लोंबकळणाऱ्या वीजतारांकडे राष्ट्रवादीने वेधले लक्ष

Taloda: NCP city president Yogesh Marathe, social activist Sandeep Pardeshi and other activists while giving a statement to Pachpande, deputy engineer of Mahavitaran.
Taloda: NCP city president Yogesh Marathe, social activist Sandeep Pardeshi and other activists while giving a statement to Pachpande, deputy engineer of Mahavitaran.esakal

तळोदा : तळोदा शहरात लोंबकळणाऱ्या वीजतारांचा विषय ऐरणीवर आला असून, शहरात ठिकठिकाणी तारांमुळे वाहतुकीस अडथळा होतो.

जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नसल्याने तळोदा शहर राष्ट्रवादीने महावितरणच्या उपअभियंत्यांना निवेदन दिले. त्यामुळे तारांना लवकरात लवकर ताण देऊन त्यांची उंची वाढविण्याची अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली आहे. (Problem of hanging electric wires in Taloda city has come to fore and traffic is obstructed due to wires various places in city Nandurbar News)

हेही वाचा : T+1 Settlement मुळे वाढेल शेअर बाजारातली उलाढाल

Taloda: NCP city president Yogesh Marathe, social activist Sandeep Pardeshi and other activists while giving a statement to Pachpande, deputy engineer of Mahavitaran.
MSTC Jalgaon News : Smart Card साठी 31 मार्चची Deadline

शहरात गल्लोगल्ली तसेच विविध रस्त्यांवर लोंबकळणाऱ्या तारांचा प्रश्न वर्षानुवर्षे प्रलंबित आहे. बस स्टॅन्डमागील बायपास रस्त्यावरदेखील तारांमुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होतो. या रस्त्यावरून शालेय विद्यार्थीदेखील मोठ्या प्रमाणावर ये-जा करीत असतात. तसेच या बायपास रस्त्यावर रहदारीही मोठ्या प्रमाणावर असताना तारांची उंची वाढविण्यात आलेली नाही.

त्यामुळेच तळोदा शहर राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष योगेश मराठे, सामाजिक कार्यकर्ते संदीप परदेशी, शहादा तळोदा विधानसभा अध्यक्ष कुणाल पाडवी, खजिनदार धर्मराज पवार, गणेश पाडवी, आदिल शेख, मुकेश पाडवी, रवींद्र पाडवी, प्रकाश पाडवी यांनी महावितरण कंपनीचे उपअभियंता पाचपांडे यांची भेट घेऊन तारा उंच करण्याची मागणी केली आहे.

Taloda: NCP city president Yogesh Marathe, social activist Sandeep Pardeshi and other activists while giving a statement to Pachpande, deputy engineer of Mahavitaran.
Municipal Corporation News : महापालिका आयुक्तपदी डॉ. विद्या गायकवाड कायम

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com