
Contract Worker Strick : ‘एकच नारा-कायम करा..., गरज सरो वैद्य मरो...’ यासह विविध घोषणांचे फलक झळकवत, जोरदार घोषणाबाजी करीत गुरुवारी (ता. २९) राष्ट्रीय आरोग्य अभियान कंत्राटी अधिकारी व कर्मचारी महासंघ तसेच समायोजन कृती समितीतर्फे शहरातून मोर्चा निघाला.
त्यात पीपीई किट घालून सहभागी कर्मचाऱ्यांनी सर्वांचे लक्ष वेधले. शासनाचा जोरदार निषेध व्यक्त केला. (protest of contract Health Campaign workers in dhule news)
शासनाने तत्काळ मागण्या मान्य कराव्यात, अन्यथा आणखी तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशाराही मोर्चेकऱ्यांनी दिला. राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत (एनआरएचएम) कंत्राटी आरोग्य कर्मचाऱ्यांचे बिनशर्त समायोजन करावे.
तोपर्यंत समान काम, समान वेतन द्यावे या प्रमुख मागणीसाठी राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांचे ३५ दिवसांपासून कामबंद आंदोलन सुरू आहे. तसेच आठ दिवसांपासून शहरातील क्युमाइन क्लबजवळ धरणे आंदोलन, बिऱ्हाड आंदोलन सुरू आहे.
कामबंद आंदोलनात जिल्ह्यातील कंत्राटी आरोग्यसेविका, सहाय्यक प्रयोगशाळा तंत्रज्ञ, औषधनिर्माण अधिकारी, वैद्यकीय अधिकारी, राष्ट्रीय बालस्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत सेवारत वैद्यकीय अधिकारी, डाटा एन्ट्री ऑपरेटर, लेखाधिकारी असे एक हजार २५० कर्मचारी, तर राज्यभरात ३५ हजार कर्मचारी सहभागी आहेत.
तब्बल ३५ दिवसांपासून आम्ही कामबंद आंदोलन करीत आहोत, तरीही शासनाला जाग आलेली नाही, त्यामुळे आम्ही मोर्चाच्या माध्यमातून शासनाचा निषेध करीत आहोत. कामबंद आंदोलनामुळे जिल्ह्यातील आरोग्यसेवा, लसीकरण ठप्प आहे. गर्भवती मातांच्या विविध चाचण्या होत नाहीत.
त्यामुळे शासनाने मागण्यांची तत्काळ दखल घ्यावी, अशी मागणी मोर्चेकऱ्यांनी केली. मोर्चाला कल्याण भवनपासून सुरवात झाली. कमलाबाई शाळामार्गे आंदोलनस्थळी मोर्चाचा समारोप झाला. मोर्चात कंत्राटी अधिकारी व कर्मचारी सहभागी झाले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.