पितृपंधरवडामुळे मंदावली नवरात्रोत्सवाची खरेदी 

गोविंद अहिरे : सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 25 सप्टेंबर 2019

मालेगाव : नवरात्र अवघ्या चार दिवसांवर आली असून यंदा मोठ्या प्रमाणात मुर्तिची विक्री होईल अशी आशा मुर्ति व्यवसायिकांना आहे. सध्या पितृपंधरवडा सुरू असल्याने नवरात्रोत्सवाच्या खरेदीसाठी ग्राहकांची म्हणावी तशी गर्दी नाही. यंदा घटस्थापनेच्या मुहूर्तावर देवीच्या मुर्तीची प्राणप्रतिष्ठापना होईल. तेव्हाच मोठ्या प्रमाणावर मुर्तिच्या खरेदीसाठी नागरीक तयार होतील.

मालेगाव : नवरात्र अवघ्या चार दिवसांवर आली असून वातावरणात रंग आतापासूनच भरण्यास प्रारंभ झाला. यासाठी विक्रेते बाजारात विक्री करण्यासाठी सज्ज झाले आहेत. तर मुर्तिकार बनविलेल्या देवीच्या मुर्तिवर शेवटचा हात फिरवत आहे. यंदा पावसाळा चांगला झाल्याने मोठ्या प्रमाणात मुर्तिची विक्री होईल अशी आशा मुर्ति व्यवसायिकांना आहे.

मुर्तिदरात कोणतीही वाढ नाही

सध्या पितृपंधरवडा सुरू असल्याने नवरात्रोत्सवाच्या खरेदीसाठी ग्राहकांची म्हणावी तशी गर्दी नाही. यंदा घटस्थापनेच्या मुहूर्तावर देवीच्या मुर्तीची प्राणप्रतिष्ठापना होईल. तेव्हाच मोठ्या प्रमाणावर मुर्तिच्या खरेदीसाठी नागरीक तयार होतील. गतवर्षी प्रमाणे यंदाही मुर्तीसाठी लागणा-या कच्चा मालाच्या भावात कोणत्याही प्रकारची वाढ नाही. त्यामुळे मुर्तिदरात कोणतीही वाढ नसल्याचे मुर्तिकार संजय सोनवणे यांनी सांगितले.

देवीच्या मुर्तिबरोबरच मातीच्या घटाला विशेष महत्त्व आहे. या काळात देवीची नऊ दिवस महिला आराधना करतात व उपवासाला महत्त्व देतात. प्लॉटर ऑफ पॅरिस पासून बनविलेल्या या मुर्ति वेगवेगळे रंग व चमकी लावल्याने आकर्षक दिसतात.  त्यामुळे मोठ्या प्रमाणात मुर्तिची विक्री होत असते.  नऊ दिवस उपवास असल्याने उपवासाच्या पदार्थांना चांगलीच मागणी असते. भगर, साबुदाणा, राजगिरा लाडू,पीठ वफळानाही मागणी मोठ्या प्रमाणात असते,

यंदा असे आहेत दर
मुर्तिसाठी लागणारा कच्चा माल पी.ओ.पी. (प्लटर आॉप पॉरीस) वॉटर कलर, गोल्डन कलर विविध प्रकारच्या चमकदार चमकी, मोती खडेजडित मुर्तिंचे दर पाचशे रूपयांपासून ते पाच हजार पर्यंत उपलब्ध आहे.

लहान मोठ्या मुर्ति बनविण्यासाठी दरवर्षी आम्ही मेहनत करतो, यंदा पावसाळा चांगला झाल्याने मोठ्या प्रमाणावर मुर्तिची विक्री होईल अशी आशा आहे. - संजय सोनवणे, मुर्तिकार


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Purchase decreased of navratri festival nashik