Unseasonal Rain : कांद्यासह गहू-हरभरा उद्‍ध्वस्त; शेतकरी हवालदिल!

Onion crop damage due to hailstorm in the area.
Onion crop damage due to hailstorm in the area. esakal

निजामपूर (जि. धुळे) : माळमाथा परिसरातील खोरी टिटाणे, आंबेमोहोर, पन्हाळीपाडा (ता. साक्री) या गावांसह परिसरात सोमवारी (ता. ६) दुपारी चार ते पाचच्या दरम्यान सुमारे एक तास अवकाळी पाऊस (unseasonal rain) व जवळपास अर्धा तास गारपीट झाल्याने रब्बी हंगामातील पिके उद्‍ध्वस्त झाली. (rabi season crops were destroyed due to unseasonal rain and hail dhule news)

त्यात विशेषतः कांदा, गहू, हरभरा, मिरची, टरबूज, खरबूज आदी पिकांचा समावेश आहे. ऐनवेळी शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास अवकाळी पावसाने हिरावून नेल्याने शेतकरी हवालदिल झाले असून, त्यांना अश्रू अनावर झाले होते.

हेही वाचा : तुमच्याकडं कागदी स्वरुपातले शेअर आहेत? मग हे वाचाच....

Onion crop damage due to hailstorm in the area.
Unseasonal Rain : अवकाळी पावसाने झोडपले; रब्बीं पिकांचे मोठे नुकसान!

रस्त्यासह पिकांवर खच्चून गारांचा थर लागला होता. अचानक आलेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांची एकच धावपळ उडाली होती. चारही गावांसह परिसरात गारपीट व जोरदार अवकाळी पाऊस झाल्याने उभी पिके उद्‍ध्वस्त झाल्यामुळे शासनाने त्वरित पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसानभरपाई द्यावी, अशी आग्रही मागणी टिटाणेचे माजी सरपंच तथा विद्यमान ग्रामपंचायत सदस्य भिकन बागूल यांनी ‘सकाळ’ला दिली.

Onion crop damage due to hailstorm in the area.
Unseasonal Rain : अवकाळीचा ‘शिमगा’; उत्तर महाराष्ट्राला जबर फटका

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com