अवकाळी पावसाने शेतकऱ्यांना रडवले 

विजयसिंग गिरासे 
Saturday, 20 February 2021

चिमठाणे : शिंदखेडा तालुक्यात गुरुवारी (ता. १८) सायंकाळी सातच्या सुमारास अवकाळी पावसामुळे तोंडाशी आलेला गहू, दादर, हरभरा, कांदा, ज्वारी, खरबूज, शेंगा, बोर फळांचे व गुरांचा चाऱ्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

शिंदखेड्या तालुक्यात सर्वांत जास्त पाऊस चिमठाणे महसूल मंडळात ४७ मिलिमीटर, तर सर्वांत कमी शेवाडे महसूल मंडळात दोन मिलिमीटर पावसाची नोंद झाली. कृषी व महसूल विभागाने संयुक्त पंचनामे करावेत, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

तालुक्यात मंडळनिहाय झालेला पाऊस 
दोंडाईचा ः आठ मिलिमीटर 
विखरण ः सात मिलिमीटर 
शेवाडे : दोन मिलिमीटर 
चिमठाणे : ४७ मिलिमीटर 
वर्शी : १३ मिलिमीटर 
खलाणे : पाच मिलिमीटर 
बेटावद : २८ मिलिमीटर 
नरडाणा : २५ मिलिमीटर 
विरदेल : नऊ मिलिमीटर 

शिंदखेडा तालुक्यात गुरुवारी रात्री झालेल्या अवकाळी पावसामुळे गहू, दादर, हरभरा, कांदा, ज्वारी आदी पिंकाचे व गुराच्या चाऱ्याचे नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश महसूल व कृषी विभागांना दिले आहेत. 
-जयकुमार रावल, आमदार शिंदखेडा मतदारसंघ 
 
संपादन- भूषण श्रीखंडे

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: rains marathi news dhule untimely rains damage agriculture farmer trouble