Ram Navami 2023 : रामभक्ताकडून बावीस लाखांचे मंदिर; दातृत्वाचे लामकानीत परिसरात कौतुक

Bhalchandra yeole  Sumanbai yeole while taking darshan in the newly built Shriram temple. Neighbor Sanjay Maharaj Bhandari.
Bhalchandra yeole Sumanbai yeole while taking darshan in the newly built Shriram temple. Neighbor Sanjay Maharaj Bhandari.esakal

लामकानी (जि.धुळे) : येथील भालचंद्र फकिरा येवले (वाणी) व त्यांच्या पत्नी सुमनबाई येवले यांनी आयुष्यभराचे कष्ट करून मिळविलेले पैसे आणि शेती विकून आलेल्या पैशांनी गावासाठी बावीस लाख रुपये खर्चून सुंदर देखणे असे राममंदिर उभारले. (ram navami 2023 Bhalchandra Yeole and Sumanbai Yeola built Ram Mandir cost of 22 lakh rupees dhule news)

येवले दांपत्याच्या दातृत्वाचे लामकानीसह परिसरात कौतुक करण्यात येत आहे. मंदिरात राजस्थानमधून प्रभू राम, माता सीता, लक्ष्मण, हनुमान व कासव यांच्या उच्च दर्जाच्या संगमरवरी सुबक मूर्ती आणल्या. तसेच २४ मार्चपासून गावत आठ दिवस अमरावती येथील पद्‍माकर महाराज देशमुख यांचा रामायण कथेचा कार्यक्रम सुरू आहे.

सुधाकर शास्त्री गुरुजी यांचे काल्याचे कीर्तन होणार असून, सुवर्ण कलशारोहण उद्धव महाराज यांच्या हस्ते झाले. ३१ मार्चला गावासाठी व परिसातील भाविक भक्तांसाठी महाप्रसादाचा कार्यक्रम होणार आहे. संपूर्ण गाव भक्तिरसात रमले आहे. भालचंद्र येवले ८३ वर्षांचे असून, सुमनबाईंचे वय ७७ वर्षे आहे. सुरवातीला गावोगावी व आठवडेबाजारात त्यांनी भाजीपाला विक्री, नंतर मसाले विक्री केली.

हेही वाचा : जीएसटीसाठी नोंदणी केलीच नाही तर??

Bhalchandra yeole  Sumanbai yeole while taking darshan in the newly built Shriram temple. Neighbor Sanjay Maharaj Bhandari.
Ram Navami 2023 : कुंचल्यातून साकारला ‘सत्याचा विजय’

आळंदी शाखेतही काही काळ सेवा बजावली. आताही लामकानी येथील आठवडेबाजारात धान्य विक्रीचा व्यवसाय सुरू आहे. त्यांना मूलबाळ नाही; परंतु परमेश्वरावर अपार श्रद्धा असल्याने गावासाठी काहीतरी नावघेणे असावे या उद्देशाने कष्टाच्या कमाईचे आणि स्वतःची शेती विकून जे काही पैसे होते ते सर्व गावात श्रीरामाचे मंदिर उभे राहावे यासाठी सढळहाताने खर्च केले. त्यांच्या या कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.

"गावात श्रीरामाचे सुंदर मंदिर बांधावे ही मोठी इच्छा होती. ती जिवंतपणी पूर्ण करता आली याचा आनंद आहे. मी जरी पैसे दिले तरी सर्व ग्रामस्थ व वाणी समाज मेहनत घेत असल्याने आभारी आहे." -भालचंद्र येवले, लामकानी

"धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमाला आयुष्यभर कमावलेल्या पुंजीतील तब्बल बावीस लाख दान देऊन मंदिर उभे करणे हे मोठे दातृत्व आहे. मंदिरामुळे गावाच्या शोभेत भर पडली." -संजय महाराज भंडारी

Bhalchandra yeole  Sumanbai yeole while taking darshan in the newly built Shriram temple. Neighbor Sanjay Maharaj Bhandari.
Ram Navami 2023 : प्रभू रामचंद्रांनी स्थापलेल्या शिवलिंगाने पावन श्रीक्षेत्र रामेश्‍वर!

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com