बोहरा समाजबांधवांचा  आजपासून "रमजान' 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 22 एप्रिल 2020

जळगावः दाऊदी बोहरा समाजबांधवांचा पवित्र रमजान महिना उद्यापासून (ता. 23) सुरू होत आहे. गुरुवारी पहिला उपवास सुरू होत आहे. 23 मेस ईद साजरी करण्यात येणार आहे.  

जळगावः दाऊदी बोहरा समाजबांधवांचा पवित्र रमजान महिना उद्यापासून (ता. 23) सुरू होत आहे. गुरुवारी पहिला उपवास सुरू होत आहे. 23 मेस ईद साजरी करण्यात येणार आहे.  
यावर्षी "कोरोना'मुळे देशात "लॉकडाउन' सुरू आहे. यामुळे सर्व दाऊदी बोहरा समाजबांधव घरी राहूनच नियमित नमाजपठण करणार आहेत. रमजान महिन्यात रोज सकाळी तसेच रात्री सव्वानऊला अर्धा तास "ऑनलाइन' पद्धतीने कुराणपठण करणार आहेत. "लॉकडाउन'मुळे रमजान महिन्यात 30 दिवसांसाठी लागणाऱ्या सर्व वस्तू धर्मगुरूंतर्फे शहरातील बोहरा समाजातील 280 परिवारास घरपोच देण्यात आल्या आहेत. संचारबंदीचे सर्व नियम काटेकोरपणे पाळावयाचे आहेत, असे धर्मगुरूंनी बोहरा समाजबांधवांना सांगितले आहे. तसेच "कोरोना'च्या संकटापासून लवकरात लवकर सुटका होण्यासाठी प्रार्थना करण्यात येणार असल्याची माहिती बोहरा समाजाचे अध्यक्ष युसूफ मकरा यांनी दिली. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ramajan' of Bohra community today

टॅग्स
टॉपिकस
Topic Tags: