जळगाव- प्रगत तंत्रज्ञान, नव्या ऊर्जा प्रकल्पांचे नियोजन, वीज वितरण सुधारणा आणि सौरउर्जेच्या झपाट्याने वाढणाऱ्या प्रकल्पांमुळे जळगाव महाराष्ट्राच्या ऊर्जाधारी जिल्ह्यांपैकी एक ठरणार आहे. सध्या जिल्ह्यातील वीज मागणी एक हजार ७४ मेगावॉट आहे. उन्हाळ्यात ही मागणी एक हजार ४०८ मेगावॉटपर्यंत वाढते. नियोजित सुधारणा आणि नवीन प्रकल्पांमुळे ६८२ मेगावॉट अतिरिक्त क्षमता निर्माण होईल. याशिवाय तीन हजार ९०० एकर जमीन सौर प्रकल्पांसाठी उपलब्ध करून दिली जाणार आहे. यामुळे जळगाव जिल्हा ऊर्जा निर्यात करणाऱ्या प्रदेशांपैकी एक बनण्याच्या दिशेने वाटचाल करीत आहे.