किराणा महागल्याने फराळाचा गोडवा कमी 

भाग्यश्री गुरव : सकाळ वृत्तसेवा 
सोमवार, 14 ऑक्टोबर 2019

दिवाळी म्हटले, की सर्वत्र चैतन्य पसरलेले असते. दिवाळीच्या पार्श्‍वभूमीवर फराळाचे बनविण्यासाठी महिलावर्गाची लगबग सुरू झाली आहे. त्यासाठी लागणारा किराणा खरेदीसाठी सध्या बाजारपेठेत गर्दी होत आहे. ऐन दिवाळीच्या तोंडावर महागाईमुळे किराणा मालाच्या दराने उसळी घेतली असून, यामुळे फराळाचा गोडवा कमी होण्याची शक्‍यता आहे. 

नाशिक : दिवाळी म्हटले, की सर्वत्र चैतन्य पसरलेले असते. दिवाळीच्या पार्श्‍वभूमीवर फराळाचे बनविण्यासाठी महिलावर्गाची लगबग सुरू झाली आहे. त्यासाठी लागणारा किराणा खरेदीसाठी सध्या बाजारपेठेत गर्दी होत आहे. ऐन दिवाळीच्या तोंडावर महागाईमुळे किराणा मालाच्या दराने उसळी घेतली असून, यामुळे फराळाचा गोडवा कमी होण्याची शक्‍यता आहे. 

शेंगदाणे दीडशे रुपये किलो, अन्य पदार्थांमध्येही भरीव वाढ 

किराणा दुकानांमध्ये खरेदी सुरू झाली असून, त्यासाठी लागणाऱ्या डाळींचे भाव वाढले आहेत. कुरमुरे, डाळ्या यांच्या भावात मागील वर्षीपेक्षा दोन ते तीन रुपयांची वाढ झाली आहे. रेडीमेड फराळ बनवून देणाऱ्या आचारी वर्गाकडून देखील किराणा माल मोठ्या प्रमाणात खरेदी केला जात आहे. किराणा मालाच्या किंमती वाढल्यामुळे ग्राहकांना त्याच्या झळा सोसाव्या लागत आहेत. करंजीसाठी लागणाऱ्या खोबऱ्याचे भाव २५ ते ३० रुपयांनी वाढले आहेत. खाऱ्या मालासाठी लागणाऱ्या पामतेलाचे भावदेखील ८० रुपयांवर आले आहेत. 

अशा आहेत किमती (भाव प्रतिकिलो) 
रवा-----------३० ते ३५ रुपये 
मैदा----------३५ ते ४० रुपये 
बेसनपीठ-------८० ते ८५ रुपये 
पोहे------------४५ ते ५०रुपये 
साखर-----------३५ ते ३८ रुपये 
मक्‍याचे पोहे------६० ते ६५रुपये 
मूगडाळ----------८५ ते ९० रुपये 
हरभराडाळ--------६४ ते ६८ रुपये 
भाजके कुरमुरे-----६६ ते ७० रुपये 
डालडा तूप--------१०० ते १०५ रुपये 
खोबरे-----------१८० ते २०० रुपये 
खारीक-----------२६० ते ३०० रुपये 
शेंगदाणे-----------१३० ते १५० रुपये 
पामतेल-----------८० रुपये लिटर 
सोयाबीन तेल-----८३ रुपये लिटर 
सूर्यफूल तेल-----९७ रुपये लिटर 

प्रतिक्रिया
मंदीमुळे ग्राहकांच्या गर्दीवर परिणाम जाणवतो आहे. काही पदार्थांचे भाव गेल्या वर्षीच्या तुलनेत वाढलेले आहेत. दिवाळीला अवघे काही दिवस शिल्लक राहिलेले असल्याने आगामी दोन-तीन दिवसांत ग्राहकांची गर्दी अपेक्षित आहे. -हेमंत पवार, विक्रेते 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Reducing the sweetness of forage by grocery prices