तरवाडे (ता. चाळीसगाव)- चाळीसगाव शहरातील मालेगाव रस्त्यावरील भारत पेट्रोलियमच्या पंपावरील कर्मचाऱ्याने सात रुपयांची नाणी घेण्यास नकार दिला. त्यामुळे ग्राहकाला प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला. याबाबत संबंधित कंपनीच्या विक्री अधिकाऱ्यांनी दखल घ्यावी, अशी मागणी ग्राहकाने केली आहे.