Job Fair : धुळ्यात बुधवारी रोजगार मेळावा; तरुणांना नोंदणीचे आवाहन | Jobs fair in Dhule | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Jobs fair in Dhule

Job Fair : धुळ्यात बुधवारी रोजगार मेळावा; तरुणांना नोंदणीचे आवाहन!

धुळे : येथील जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रातर्फे बुधवारी (ता. २५) सकाळी दहा ते दुपारी चारपर्यंत जुने जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार व उद्योजकता मेळावा होणार आहे, अशी माहिती केंद्राचे सहाय्यक आयुक्त राजू वाकुडे यांनी दिली. (registration started for Job fair for youth dhule on 25 january dhule news)

शासनाच्या कौशल्य विकास कार्यक्रमांतर्गत प्रशिक्षित झालेल्या आणि महास्वयम वेबपोर्टलवर नोंदणीकृत उमेदवारांना रोजगार व स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध होण्यासाठी प्लेसमेंट ड्राइव्ह मेळावा आयोजित करण्यात आला आहे.

या उपक्रमामार्फत तरुणाईला रोजगाराची संधी मिळणार असल्याने प्लेसमेंट ड्राइव्ह बेरोजगारांना आशेचा किरण ठरणार आहे. या मेळाव्यात रोजगार देणाऱ्या जिल्ह्यातील तसेच इतर नियोक्ते उपस्थितीतून प्रत्यक्ष मुलाखती घेणार आहेत.

हेही वाचा : मेडिकल मॅनेजमेंटही हृदयविकारावर ठरु शकते उपाय

हेही वाचा: Nashik News : आदिवासी विद्यार्थ्यांचे नाशिकमध्ये आंदोलन

विविध सूचना

रोजगार इच्छुक उमेदवारांनी बायोडाटा व फोटो, आधारकार्ड, सेवायोजन नोंदणीसह उपस्थित राहावे. गरजू विद्यार्थ्यांनी प्लेसमेंट ड्राइव्हमध्ये सहभागी होण्यासाठी विभागाच्या www.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर नावनोंदणी करणे आवश्यक आहे. विभागाच्या संकेतस्थळाला भेट देऊन आपल्या शैक्षणिक पात्रतेनुसार पदांची खात्री करावी व ऑनलाइन अर्ज करावा.

नोकरी इच्छुक उमेदवारांनी अद्यापपर्यंत सेवायोजन नोंदणी केली नसल्यास या संकेतस्थळावर नोंदणी करावी. तसेच यापूर्वी महारोजगार वेबपोर्टलवर नोदणी केली असल्यास सुधारित संकेतस्थळावर आपला १५ अंकी नोंदणी क्रमांक टाकून लॉगिन करावा आणि मोबाईल व आधार क्रमांक पडताळणी करावा.

भरती इच्छुक नियोक्तेंनी जास्तीत जास्त रिक्त पदे या संकेतस्थळावर प्लेसमेंट ड्राइव्ह/पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा ०२ यावर नोंदणी करावी. याबाबत सहाय्यासाठी कार्यालयाच्या ०२५६२-२९५३४१ या दूरध्वनीवर कार्यालयीन वेळेत संपर्क साधण्याचे आवाहन श्री. वाकुडे यांनी केले.

हेही वाचा: Nashik: आपल्या शक्तीने कॅन्सर बरा करा अन् मिळवा 51 लाख रोख; नाशिकच्या महंतांकडून बक्षिस जाहिर