लासलगाव- देशांतर्गत कांदा दरावर नियंत्रण ठेवण्याच्या उद्देशाने केंद्र सरकारने कांदा निर्यातीवर २० टक्के शुल्क लावले आहे. यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत असून, लासलगाव बाजार समितीने हे शुल्क तत्काळ रद्द करण्याची मागणी केली. सभापती बाळासाहेब क्षीरसागर यांनी केंद्रीय मंत्री पीयूष गोयल, निर्मला सीतारामन, शिवराजसिंह चौहान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार यांना निवेदन दिले.