Kisan Samman Fund : किसान सन्मान निधीसाठी ई-केवायसीचे आवाहन; येथे करा E KYC प्रमाणीकरण

kissan
kissangoogle

धुळे : प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (Kisan Samman Fund) योजनेंतर्गत जिल्ह्यातील ८० टक्के लाभार्थ्यांनी ऑनलाइन ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण केली आहे. (request to Beneficiaries for e KYC of Kisan Samman Fund dhule news)

अद्याप २० टक्के लाभार्थ्यांची ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण झालेली नसल्याने उर्वरित लाभार्थ्यांनी तत्काळ ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करावी, अन्यथा या लाभार्थ्यांना योजनेच्या पुढील लाभापासून वंचित राहावे लागेल, असे जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी कळविले आहे.

प्रधानमंत्री किसान सन्मान निधीच्या https://pmkisan.gov.in या संकेतस्थळावरील फार्मर कॉर्नर (Farmer Corner) या टॅबमध्ये किंवा पीएम किसान अॅपमध्ये ओटीपीद्वारे लाभार्थ्यांना स्वतः ई-केवायसी प्रमाणीकरण मोफत करता येईल.

हेही वाचा : जीएसटीसाठी नोंदणी केलीच नाही तर??

kissan
Ram Navami 2023 : काळाराम मंदिरातील गर्दीने मागील विक्रम मोडीत! ‘फुटफॉल' मोजणी यंत्र निकामी

तसेच ग्राहक सेवा केंद्रावर (CSC) नाममात्र शुल्कात ई-केवायसी बायोमेट्रिक पद्धतीने करता येईल, असे योजनेचे नोडल अधिकारी तथा निवासी उपजिल्हाधिकारी संजय गायकवाड यांनी कळविले आहे.

kissan
Dhule News : सिद्धेश्वर मंदिर चौकासह पथदीपांसाठी 1 कोटी; अग्रवाल यांचा पाठपुरावा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com