अक्कलकुवा, अक्राणी, शहादा पं. स.सभापती महिला राखीव

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 15 जानेवारी 2020

नंदुरबार : जिल्ह्यातील सहाही पंचायत समिती सभापतिपदाचे आरक्षण आज काढण्यात आले. त्यात अक्कलकुवा, अक्राणी व शहादा या तीन पंचायत समितीसाठी अनुसूचित जमाती महिला तर तळोदा, नवापूर व नंदुरबार पंचायत समितीचे सभापतिपद अनुसूचित जमाती या प्रवर्गासाठी राखीव निघाले आहे.

जिल्ह्यातील सहाही पंचायत समितीच्या सभापती पदासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात आज सकाळी अकराला आरक्षण सोडत काढण्यात आली.अप्पर जिल्हाधिकारी दत्तात्रय बोरुडे यांचे अध्यक्षतेखाली आरक्षण सोडतीसाठी विशेष सभा झाली. या सभेत १६ जानेवारी २०२० पासून सुरु होणाऱ्या अडीच वर्षाच्या कालावधीसाठी आरक्षण जाहीर करण्यात आले.

उस कापताना अचानक ते समोर आले अन् मजुर भीतीने घामाघूम

या सभापती आरक्षणामध्ये पेसा क्षेत्रातील अक्कलकुवा,अक्राणी या दोन पंचायत समितीसाठी अनुसूचित जमाती महिला आरक्षण निश्चित करण्यात आले आहे. तसेच तळोदा , नवापुर व नंदुरबार या तीन पंचायत समिती सभापतीपदासाठी अनुसूचित जमाती प्रवगार्चे आरक्षण निघाले आहे. नंदुरबार व शहादा पंचायत समिती हे अंशतः अनुसूचित जमाती क्षेत्रात येतात.
 
स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Reserved Seats for Panchayayt Samitee speaker in Shahada