जळगाव: शहरात झालेल्या महसूल दिनाच्या कार्यक्रमात आज (ता. १) जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या कामावर जलसंपदा मंत्री गिरीश महाजन फारच फिदा असल्याचे दिसून आहे. ते आपल्या भाषणात म्हणाले, जिल्हाधिकाऱ्यांचे काम चांगले आहे, सर्वांना ते सांभाळून घेतात. सगळ्यांना ते आपलेसे वाटतात. आमदार राजूमामा भोळे यांना ते ‘मामा’ म्हणतात, पण जिल्हाधिकारी आयुष प्रसाद सर्वांना ‘मामा’ बनवतात. या कोपरखळीने सभागृहात मात्र चांगलाच हंशा पिकला.