Latest Marathi News | जयंत पाटलांचे निलंबन मागे घ्या;राष्ट्रवादी काँग्रेसची मागणी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

NCP Agitation

Dhule News : जयंत पाटलांचे निलंबन मागे घ्या;राष्ट्रवादी काँग्रेसची मागणी

धुळे : राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या विधानसभेतील निलंबनाविरोधात जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसने शुक्रवारी (ता. २३) जिल्हा प्रशासनाला निवेदन दिले. तसेच, निदर्शने करून निलंबन त्वरित मागे घ्यावे, अशी मागणी केली. आंदोलकांनी शिंदे- फडणवीस सरकारचा निषेध केला.

नागपूर येथे विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनदरम्यान शिंदे सरकारने राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना अकारण निलंबित केले. हे लोकशाहीचा गळा घोटण्यासारखे आहे. जनतेने निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधीला विधानसभेत मत मांडण्याचा अधिकार आहे. आमदार पाटील यांचे निलंबन करून एकप्रकारे लोकशाहीऐवजी हुकूमशाही सुरू केली आहे. (Revoke Jayant Patil suspension Nationalist Congress demand Dhule News)

हेही वाचा : प्रेमाला धर्म आहे...?

हेही वाचा: YIN Election 2022- 23 : ‘यिन’ची 115 महाविद्यालयांत निवडणूक; येथे करा अर्ज

जनतेचे विहित मुद्द्यावरील लक्ष अन्यत्र वळविण्यासाठी निलंबन केले आहे. जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे धुळे ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष सुरेश सोनवणे, शहर जिल्हाध्यक्ष रणजित भोसले, किरण शिंदे, नरेंद्र मराठे, गोरख शर्मा, दिनेश मोरे, राजू चौधरी, किरण पाटील, कुणाल पवार, रामेश्वर साबळे, महेंद्र शिरसाट, राजेंद्र चितोडकर, मंगेश जगताप, दीपक देसले, भिका नेरकर, सरोज कदम, उमेश महाले, स्वामिनी पारखे, जितू पाटील, संजय माळी, सतीश पाटील, युवराज बागूल, हाजी हाशीम कुरेशी, असलम खाटीक, दिलीप पाटील, शरीफ पटेल, कल्पेश मगर, निर्मला शिंदे, वंदना केदार, रईस काझी, विजय वाघ, डॉमनिक मलबारी आदी उपस्थित होते.

हेही वाचा: Nandurbar News : नवापूर साखर कारखान्याचे आज मतदान; उद्या मतमोजणी