Dhule Crime News : साखरपुड्यासाठी गेलेल्या सानेंकडे चोरट्यांचा डल्ला! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

robbery

Dhule Crime News : साखरपुड्यासाठी गेलेल्या सानेंकडे चोरट्यांचा डल्ला!

धुळे : शहरातील झेंडेनगरात चोरट्यांनी घरफोडी करीत रोकडसह दागिने, असा लाखो़ंचा ऐवज लंपास केला, असा प्राथमिक अंदाज आहे. (robbery at house went for function Dhule Crime News)

हेही वाचा : जोखमीचे भान राखूनच करा SIP मध्ये गुंतवणूक

झेंडेनगरातील प्लॉट क्रमांक २७ येथे बापू साने वास्तव्यास आहेत. ते सहकुटुंब पुतणीच्या साखरपुड्यासाठी सुरत येथे गेले आहेत. त्यामुळे घर बंद होते. ही संधी साधत चोरट्यांनी या घरावर डल्ला मारला.

रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास बंद घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी कपाटातील दागिने व रोकड लांबविल्याचे सांगण्यात येत आहे. सकाळी बापू साने यांच्या घराशेजारील त्यांची पुतणी ही साफसफाईसाठी गेली असता तिला चोरीची घटना लक्षात आली. माहिती मिळताच शहर पोलिस ठाण्याच्या पथकाने घटनास्थळी भेट देत पाहणी केली.

हेही वाचा: Jalgaon News : कर्जबाजारी, नापिकीला कंटाळून वर्षभरात 181 शेतकऱ्यांच्या आत्महत्या