‘सिव्हिल’मधील स्टोररूम फोडले

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 15 जानेवारी 2020

जळगावः जिल्हा रुगणालयाच्या आवारात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता यांच्या निवलस्थानासमोरील आरोग्य विभागाचे स्टोअर रुम फोडून चोरट्यांनी १२ हजारांचा ऐवज लंपास केला. ही घटना सोमवारी (ता. १३) दुपारी उघडकीस आली. या प्रकरणी जिल्हापेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पारखनगर येथे विजय राजेंद्र नारखेडे (वय ३७) हे कुटूंबासह वास्तव्यास असून, ते जिल्हा रुग्णालयातील जिल्हा कार्यशाळेचे (आरोग्यसेवा) सेवा अभियंता म्हणून कार्यरत आहेत. दुपारी तीनच्या सुमारास नारखेडे जिल्हा रुग्णालय आवारातील वर्कशॉपच्या स्टोररुमकडे लघुशंकेसाठी गेले होते. यावेळी त्यांना स्टोअर रुमच्या लाकडी फळ्या तोडलेल्या दिसल्या.

उस कापताना ते समो आले अन् मजुर भितीने घामाघूम

नारखेडे यांनी हा प्रकार सहकारी कर्मचारी सुभाष प्रजापती यांना सांगितला. त्यानंतर दोघेही जिल्हा शल्यचिकीत्सकांकडे गेले. त्यांना त्या गटनेची माहिती दिली. घटनास्थळाची पाहणी केल्यावर स्टोअर रुममधील जुने निरुपयोगी भंगार साहित्या चोरीस गेल्याचे आढळून आले. त्यानंतर नारखेडे यांनी जिल्हापेठ पोलिस ठाण्यात तक्रर दिली.

काय लांबविला एवज

चोरट्यांनी स्टोअररुमच्या फळ्या तोडून कैची, सस्पेशन बुक, टाय रॉड एन्ड सेट, बॉल जाँईट, व्हील बेरिंग, ब्रेक डिक्स, ब्रेक पँड, व्हील सिलिंडर असेंब्ली आदी वैद्यकीय विभागाला लागणारे ८०० किलो वजनाचे १२ हजार रुपये किमतीचे साहित्य लांबविले आहे.
 
स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Robbery at Civil hospital storeroom in Jalgaon

टॅग्स
टॉपिकस
Topic Tags: