आरटीओ 'एसीबी'च्याच जाळ्यात

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 25 जुलै 2019

सीमा तपासणी नाक्‍यावर नेमणुकीसाठी तक्रारदाराकडे तब्बल साडेचार लाखांच्या लाचेची मागणी करणारे खानदेशचे प्रादेशिक परिवहन अधिकारी परवेज खुदायारखॉं तडवीला नाशिकस्थित लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सकाळी त्याच्या निवासस्थानी अटक केली. तडवी कार्यालयात जात असताना ही कारवाई झाली.

धुळे - सीमा तपासणी नाक्‍यावर नेमणुकीसाठी तक्रारदाराकडे तब्बल साडेचार लाखांच्या लाचेची मागणी करणारे खानदेशचे प्रादेशिक परिवहन अधिकारी परवेज खुदायारखॉं तडवीला नाशिकस्थित लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सकाळी त्याच्या निवासस्थानी अटक केली. तडवी कार्यालयात जात असताना ही कारवाई झाली.

या प्रकरणी देवपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. विशेष म्हणजे आरटीओ अधिकारी तडवीवर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दुसऱ्यांदा कारवाई केली आहे. डोनदिगर (ता. चाळीसगाव, जि. जळगाव) येथील तक्रारदाराची नियमाप्रमाणे चक्राकार पद्धतीने सीमा तपासणी नाक्‍यावर नेमणूक होणार होती. त्यासाठी येथील मुख्य प्रादेशिक परिवहन अधिकारी तडवीने दूरध्वनीद्वारे संबंधित तक्रारदाराकडे साडेचार लाख रुपयांची मागणी केली. तक्रारदाराने नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे दोन जुलैला तक्रार दाखल केली. शहानिशा झाल्यावर विशेष पथकाने आज सकाळी यशस्वी सापळा रचून देवपूरमधील दत्त कॉलनीतील (प्लॉट क्रमांक 12 "ब') निवासस्थानातून तडवीला अटक केली. विभागाचे पोलिस अधीक्षक सुनील कडासने, अपर पोलिस अधीक्षक नीलेश सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक हेमंतकुमार भामरे यांच्या पथकाने ही कारवाई केली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: RTO ACB Crime