Latest Marathi News | मद्यविक्रीप्रश्‍नी सोडा विक्रेत्यांवर कारवाई : हृषीकेश रेड्डी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Rushikesh Reddy

Dhule News | मद्यविक्रीप्रश्‍नी सोडा विक्रेत्यांवर कारवाई : हृषीकेश रेड्डी

धुळे : शहरात मद्यपींसाठी सोड्याच्या गाड्या हक्काचा अड्डा बनला आहे. सोडा विक्रीबरोबर किंवा सोड्याऐवजी काही विक्रेते छुप्या पद्धतीने दारूची विक्री करत असल्याच्या तक्रारी वाढत आहेत. सोडा व्यावसायिकांनी अशा गैरप्रकाराला थारा देऊ नये.

अन्यथा, त्यांच्यावर कठोर कारवाईचा इशारा सहाय्यक पोलिस अधीक्षक तथा शहराचे पोलिस उपअधीक्षक एस. हृषिकेश रेड्डी यांनी दिला आहे. (Rushikesh Reddy action Liquor issue action against soda dealers Dhule News)

हेही वाचा : द मिसिंग टाइल सिंड्रोम ठेवा आपल्यापासून दूर

हेही वाचा: Nashik News : 12 वर्षीय बालकाच्या अपहरण प्रकरणातील चौथा संशयित गजाआड

पोलिस पथकाने शहरातील पाच सोडा विक्रेत्यांवर शुक्रवारी (ता. ६) कारवाई करत हा इशारा दिला. शहरातील अनेक सोडा गाड्यांना मिनीबारचे स्वरुप आले आहे. बाहेरुन पार्सल आणायचे आणि सोड्यात टाकून मद्य रिचवायचे, असा कार्यक्रम सुरू असल्याचे बहुतेक ठिकाणी दिसून येते.

काही सोडा गाडीचालक स्वत:च मद्याचा पुरवठा करतात. दारू प्लस सोडा, अशी डबल कमाई होत असल्याने अनेकांचा गल्ला चांगलाच भरतो. त्यामुळे रात्री सोडा गाड्यांवर बाजार भरलेला दिसतो. या पार्श्वभूमीवर शहर पोलिसांनी शुक्रवारी (ता. ६) बारापत्थर आणि श्री गणपती मंदिराजवळील सोडा विक्रेत्यांविरुद्ध कारवाई केली.

तसेच अन्य ठिकाणी तीन जणांवर कारवाई केली. सोडा विक्रेत्यांनी मद्यपींना दारू विक्री करु नये. शिवाय दारू पिण्यास जागा देऊ नये. आदेशाचा भंग केल्यास विक्रेत्यांवर कठोर कारवाई होईल, असा इशारा उपअधीक्षक रेड्डी यांनी दिला.

हेही वाचा: Nashik News : दगडी पाटी झाली आधुनिकतेच्या तंत्रज्ञानात हद्दपार