esakal | चिखलीकर लाचप्रकरणाचा आज निकाल 
sakal

बोलून बातमी शोधा

Residential photo

चिखलीकर लाचप्रकरणाचा आज निकाल 

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नाशिक : बहुचर्चित सार्वजनिक बांधकाम विभागाच्या नाशिकचे कार्यकारी अभियंता सतीष मधुकर चिखलीकर, शाखा अभियंता जगदीश वाघ यांनी ठेकेदाराकडून घेतलेल्या लाच प्रकरणाचा उद्या (ता.26) नाशिक जिल्हा न्यायालयात निकाल लागण्याची शक्‍यता आहे. ठेकेदाराकडून 22 हजार रुपयांची लाच घेताना दोघांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने एप्रिल 2013 साली रंगहाथ पकडले होते. यातूनच चिखलीकर याच्याकडे जमविलेली कोट्यवधींची "माया' तपासातून समोर आली होती. 

30 एप्रिल 2013 रोजी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या ठेकेदाराकडून बिलाची फाईल मंजूर करण्यासाठी लाचखोर कार्यकारी अभियंता सतिश चिखलीवर व शाखा अभियंता जगदीश वाघ यांना 22 हजारर रुपयांची लाच स्वीकारली होती. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगहाथ अटक केली होती. ठेकेदाराचे 3 लाख 69 हजार रुपयांचे बिल मंजुर करण्याच्या मोबदल्यात त्यांनी लाच मागितली होती. याप्रकरणी सरकारवाडा पोलिसांत दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. 
लाचलुचपत प्रतिबंदक विभागाच्या पथकाने तपास करीत, सुमारे 2 हजार पानी दोषारोपपत्र जिल्हा न्यायालयात दाखल केले आहे. या तपासादरम्यान, सतिश चिखलीकर याच्याकडे 14 कोटी 66 लाख 17 हजार 646 रुपयांची अपसंपदा आढळून आल्याचेही समोर आले होते. तर गेल्या जुलै 2018 मध्ये न्यायालयातून लाचखोर प्रकरणातील मूळ तक्रारच गहाळ झाल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला होता. याप्रकरणी सरकारवाडा पोलीसात गुन्हा दाखल आहे. राज्यभरात गाजलेल्या या लाचप्रकरणाच्या खटल्याचा उद्या (ता.26) जिल्हा न्यायालयाचे न्या. एन.जी. गिमेकर हे निकाल देण्याची शक्‍यता आहे. सरकारी पक्षातर्फे ऍड. अजय मिसर यांनी कामकाज पाहिले आहे.  

 
 

loading image
go to top