esakal | युवकाचा मोबाईल हिसकावला 
sakal

बोलून बातमी शोधा

Residential photo

युवकाचा मोबाईल हिसकावला 

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा


नाशिक : माझ्या भाचीच्या कट मारून तिचा पाय फॅक्‍चर केल्याची बतावणी करून संशयितांनी युवकाच्या हातातील मोबाईल बळजबरीने हिसकावून पोबारा केल्याची घटना घडली. लता किसन काकड (रा. पार्थआदित्य अपार्टमेंट, लोणकर मळा, जयभवानी रोड, नाशिकरोड) यांच्या फिर्यादीनुसार, गेल्या शुक्रवारी रात्री आठ वाजेच्या सुमारास त्यांचा मुलगा शिवम व त्याचा मित्र पार्थ हे दोघे अकरावीची शिकवणी सुटल्यानंतर मुक्तिधाम येथे नाष्टा करण्यासाठी गेले होते. त्यावेळी अज्ञात संशयित त्यांच्याजवळ आला आणि माझ्या भाजीला सायकलने कट मारून तिचा पाय फॅक्‍चर केल्याची कुरापत काढून दमदाटी केली. त्यानंतर पार्थ यास टीजेएसबी बॅंकेजवळ बोलावून घेत त्याच्याकडील विवोचा मोबाईल बळजबरीने हिसकावून घेत पोबारा केला. याप्रकरणी उपनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

loading image
go to top