esakal | वडनेर भैरव शिवारात जुगार अड्ड्यावर छापा 
sakal

बोलून बातमी शोधा

Residential photo

वडनेर भैरव शिवारात जुगार अड्ड्यावर छापा 

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नाशिक : वडनेर भैरव शिवारात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर छापा टाकत 8 संशयित जुगाऱ्यांना ताब्यात घेत, त्यांच्याकडून 68 हजार 470 रुपयांची रोकड, जुगाराचे साहित्य असा मुद्देमाल जप्त केला. नाशिक ग्रामीणच्या स्थानिक गुन्हेशाखेच्या पथकाने सदरची कारवाई केली आहे. 

नाशिक ग्रामीणच्या पोलीस अधीक्षक डॉ. आरती सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाकडून गेल्या शनिवारी (ता.24) चांदवड तालुकयात गस्त सुरू होती. त्यावेळी स्थानिक गुन्हेशाखेचे पोलीस निरीक्षक के. के. पाटील यांना वडनेर भैरव शिवारात जुगार अड्‌डा सुरू असल्याची खबर मिळाली होती. त्यानुसार पथकाने तपास करीत, शिवारातील तांबे लॉन्स परिसरात जुगार अड्डा सुरू असल्याचे खात्रीलायक समजले. त्यानंतर पोलिसांनी त्या जुगार अड्ड्यावर छापा टाकला आणि आठ जुगाऱ्यांना अटक केली. सदरच्या ठिकाणी 52 पानी पत्त्यांच्या कॅटवर तिरट नावाचा जुगार खेळला जात होता. घटनास्थळावरून पोलिसांनी 68 हजार 470रुपये व जुगाराचे साहित्य असा मुद्देमाल जप्त केला. सदरची कामगिरी पोलीस उपनिरीक्षक शितलकुमार नाईक, हवालदार संजय गोसावी, रविंद्र वानखेडे, पोलीस नाईक जालिंदर खराटे, शिपाई मंगेश गोसावी, सुशांत मरकड, रमेश काकडे यांच्या पथकाने बजावली. 

अटक जुगारी 
आनंदा राजाराम पवार (रा. वडाळीभोई, ता. चांदवड), नितीन चंद्रकांत बागलाणे (रा. चिंचखेड रोड, पिंपळगाव बसवंत), निलेश पंढरीनाथ वक्ते, राहुल राजेंद्र साळुंके, सतिष रविंद्र आंबेकर, अमोल साहेबराव गचाले, महेश रामचंद्र धाकतोडे, सचीन प्रकाश निखाडे (सर्व रा. वडनेर भैरव, ता. चांदवड) अशी संशयित जुगाऱ्यांची नावे असून याप्रकरणी वडनेर भैरव पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

loading image
go to top