esakal | शहरात दुचाक्‍या चोरट्यांचा धुमाकूळ सुरूच 
sakal

बोलून बातमी शोधा

Residential photo

शहरात दुचाक्‍या चोरट्यांचा धुमाकूळ सुरूच 

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नाशिक : शहरातील देवळाली कॅम्प, सातपूर, इंदिरानगर, सरकारवाडा या पोलीस ठाण्यांच्या हद्दीतून चार दुचाक्‍या चोरीला गेल्या आहेत. दुचाक्‍या चोरट्यांचा शहरात सुरू असलेला धुमाकूळ सुरूच असून रोज दुचाक्‍या चोरीच्या घटना घडत आहेत. त्यामुळे शहर पोलिसांची रात्रीची गस्त वा नाकाबंदी कुचकामी ठरत असल्याची टीका त्रस्त नागरिकांकडून होते आहे. 

येसुदास बाबु फ्रेन्सिस (रा. शिंगवे बहुला) यांची 60 हजार रुपये किमतीची बजाज पल्सर दुचाकी (एमएच 15 इव्ही 3254) गेल्या बुधवारी (ता.28) मध्यरात्रीच्या सुमारास राहत्या घरासमोर पार्क केली असता, अज्ञात चोरट्याने चोरून नेली. याप्रकरणी देवळाली कॅम्प पोलिसात गुन्हा दाखल आहे. दीपक दत्तात्रय पवार (रा. गणेशदर्शन अपार्टमेंट, नागरे चौक, अशोकनगर, सातपूर) यांची 25 हजार रुपये किमतीची होंडा दुचाकी (एमएच 19 बीएल 2851) एबीबी कंपनीच्या बाहेरील पार्किंगमध्ये पार्क केली असता, गेल्या 14 ऑगस्ट रोजी सकाळी साडेआठ वाजेच्या सुमारास अज्ञात चोरट्याने चोरून नेली. याप्रकरणी सातपूर पोलिसात गुन्हा दाखल आहे. सुदामा अमृतलाल विश्‍वकर्मा (रा. जनार्दनस्वामीनगर, म्हाडा कॉलनी, इंदिरानगर) यांची 15 हजार रुपये किमतीची दुचाकी (एमएच 15 डीजे 8906) गेल्या शुक्रवारी (ता.30) दुपारी चार वाजेच्या सुमारास रथचक्र चौकातील वनसंपदा कॉलनीतून अज्ञात चोरट्याने चोरून नेली. याप्रकरणी इंदिरानगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर, प्रतिक्षा प्रविणकुमार संचेती (रा. संचित अपार्टमेंट, मंगलनगर, गंगापूररोड) यांची 27 हजार रुपये किमतीची ऍक्‍टिवा मोपेड (एमएच 15 डीक्‍यु 0887) गेल्या शुक्रवारी (ता.30) सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास ठक्कर बाजार बसस्थानकातील पद्‌मालक्ष्मी हॉटेल समोर पार्क केली होती. सदरची मोपेड पार्किंगमधून बाहेर काढत असताना, संशयिताने तिला मदतीसाठी आला आणि मोपेड चालू करून पोबारा केला. याप्रकरणी सरकारवाडा पोलिसात गुन्हा दाखल आहे.  

 
 

loading image
go to top