esakal | वेगवेगळ्या घटनात दोघांवर प्राणघातक हल्ला 
sakal

बोलून बातमी शोधा

Residential photo

वेगवेगळ्या घटनात दोघांवर प्राणघातक हल्ला 

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नाशिक : अनैतिक संबंधातून त्रास देणाऱ्यास गंभीर मारहाण करण्याची सुपारी देत, संशयितांनी पिस्तोलचा धाक दाखवून रिक्षा युनियनच्या पदाधिकाऱ्यावर प्राणघातक हल्ला केला. याप्रकरणी पंचवटी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर दुसऱ्या घटनेत सातपूरच्या बारमध्ये बिल देण्यावरून वाद होऊन हॉटेलच्या कामगारांनी चाकू व बेसबॉलने मारून जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी सातपूर पोलिसात गुन्हा दाखल आहे. 

पंचवटी पोलिसात बाबासाहेब उर्फ मामा राजवाडे (रा. भाविक ऍक्वा बिल्डिंग, समर्थनगर, पंचवटी) यांच्या फिर्यादीनुसार, त्यांचे एका महिलेशी अनैतिक संबंध असून त्यातून त्यांच्यात काही वाद झाले होते. त्यामुळे सदरील महिलेने मामा राजवाडे यांना गंभीर मारहाण करण्यासाठी तिघा संशयितांना सुपारी दिली होती. संशयित शुभम देवरे, आरबाज शेख, मंजूर समद मन्सुरी असे संशयितांची नावे आहेत. त्यानुसार इनोव्हातून आलेल्या संशयितांनी गेल्या रविवारी मध्यरात्री सव्वा-दीड वाजेच्या सुमारास मामा राजवाडे यांना त्यांच्या घराजवळ गाठले आणि संशयित शुभम देवरे याने माम राजवाडे यांच्यावर पिस्तोल रोखले तर आरबाज शेख याने चाकूचा धाक दाखवून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी पंचवटी पोलिसात प्राणघातक हल्ल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस निरीक्षक ए.एस. साखरे हे तपास करीत आहेत. 
तर, दुसरी घटना सातपूरच्या श्रमिकनगरमधील साईलिला बारमध्ये शनिवारी (ता.31) रात्री दारुच्या बिलावरून हाणामारीची घटना घडली. गंगाधर बाळू घोटेकर (रा. स्वामी समर्थ अपार्टमेंट, शिवाजीनगर, सातपूर) यांच्या फिर्यादीनुसार, गेल्या शनिवारी ते मित्र ज्ञानेश्‍वर सोमसे, प्रदीप चव्हाण यांच्यासमवेत साईलिला हॉटेलमध्ये दारु पित बसले होते. त्यांनी दारुचे बिल 100दिले. त्याचा राग येऊन संशयित विनोद बाळासाहेब बर्वे (40), राकेश नरेश राम (27), मुकेश ज्ञानेश्‍वर डोके (50, सर्व रा. साईलिला बार हॉटेल) यांनी शिवीगाळ करीत त्यांना धक्काबुक्की केली. तसच, एकाच्या डोक्‍यात चाकूने वार केला. तर बेसबॉलच्या दांडक्‍याने मारहाण केली. यात घोटेकर यांच्या हाताचे हाड फॅक्‍चर झाले आहे. याप्रकरणी सातपूर पोलिसात प्राणघातक हल्ल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे

loading image
go to top