साक्री- येथील नगरपंचायतीच्या मुख्याधिकारीपदाचा प्रभारी पदभार असताना दीपक पाटील यांचा मनमानी कारभार, ठेकेदारांशी संगनमत, आर्थिक देवाणघेवाणीत रस, कर्मचाऱ्यांवर वचक नसणे आणि दिशाहीन प्रशासकीय कारभार, अशा एक ना अनेक गंभीर तक्रारी करीत त्यांच्या गैरकारभाराची चौकशी करावी आणि पदभार काढून घेण्यात यावा, अशी मागणी नगराध्यक्षा जयश्री पवार व सदस्य नगरसेवकांनी केली. त्याची गांभीर्याने दखल घेत नाशिक विभागीय आयुक्त प्रवीण गेडाम यांनी मुख्याधिकारी पाटील यांची सोमवारीच (ता. ७) साक्रीतून तडकाफडकी उचलबांगडी केली.