Sakri police
sakal
साक्री: साक्री आणि पिंपळनेर पोलिस ठाण्याच्या हद्दीत शेतकऱ्यांच्या शेतातून कापूस, सोयाबीन आणि बाजरीची चोरी करणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा साक्री पोलिस आणि स्थानिक गुन्हे शाखेने पर्दाफाश केला. या कारवाईत पोलिसांनी पाच जणांना अटक केली असून, त्यांच्याकडून चोरीचा शेतीमाल आणि वाहने, असा एकूण ९ लाख ८५ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.