Theft
sakal
साक्री: शहरातील उच्चभ्रू वस्तीमधील कॉलनी परिसरात चोरट्यांनी सोमवारी (ता. १६) रात्री तीन ठिकाणी धाडसी चोऱ्या करून धुमाकूळ घातला. अरिहंतनगरमधील निवृत्त शिक्षकांची दोन घरे आणि राष्ट्रीय महामार्गावरील एका बिअर बारचे कुलूप तोडून चोरट्यांनी ऐवज लांबविला. या घटनेमुळे शहरात भीतीचे वातावरण असून, पोलिस प्रशासनाच्या गस्तीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.