Latest Marathi News | नशेच्या गोळ्यांची विक्री; संशयित तरुणावर गुन्हा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

 intoxicating pills

Dhule Crime : नशेच्या गोळ्यांची विक्री; संशयित तरुणावर गुन्हा

धुळे : शहरातील ऐंशीफूटी रोडवरील नटराज थिएटर परिसरात नशेच्या गोळ्या विक्री करणाऱ्या संशयित तरुणाला आझादनगर पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याच्याकडून १४ हजार किमतीच्या गुंगीकारक औषधांच्या बाटल्या आणि गोळ्या जप्त केल्या. (sale of intoxicating pills case filed against suspected youth dhule latest crime news)

नशेच्या गोळ्या विक्रीबाबत माहिती मिळाल्यावर पोलिस निरीक्षक प्रमोद पाटील यांनी अन्न- औषध प्रशासनाचे औषध निरिक्षक प्रशांत ब्राम्हणकर यांच्यासह संयुक्त कारवाई केली. नटराज थिएटर परिसरातून पत्र्याच्या शेडच्या आडोशाला संशयित कापडी पिशवी दिसली. पोलिस पथक दिसताच संशयिताने पलायनाचा प्रयत्न केला. मात्र त्याला पोलिसांनी पकडले.

हेही वाचा: Adimaya- Adishakti : एकमेव वीर आसनातील बैठकीतील सांडव्यावरची देवी

त्याच्या पिशवीत १४ हजार किमतीच्या ८६ औषधी बाटल्या, गुलाबी रंगाच्या गुंगीच्या गोळ्या आढळल्या. या प्रकरणी पोलिसांनी गणेश प्रवीण सोनार (वय ३०, रा. काझी प्लॉट, धुळे) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. पोलिस निरीक्षक प्रमोद पाटील, सहाय्यक अधिकारी पावरा, उपनिरीक्षक मोरे, कर्मचारी प्रकाश माळी, शोएब बेग, संदीप कढरे, योगेश शिंदे, संतोष घुगे, प्रमोद खैरनार, प्रवीण खैरनार, हरिश गोऱ्हे, आतीक शेख यांनी ही कारवाई केली.

हेही वाचा: Nashik Crime News : उद्योजक शिरीश सोनवणे खून प्रकरणाचा अखेर उलगडा!

टॅग्स :DhulecrimeDrug