अमळनेर- ‘खरा तो एकचि धर्म.. जगाला प्रेम अर्पावे’ या आपल्या गीतातून जगाला मानवतेचा संदेश देणाऱ्या पूज्य साने गुरुजींच्या कर्मभूमीतच त्यांचे प्रस्तावित स्मारक उपेक्षित आहे. गेल्या वर्षी झालेल्या साहित्य संमेलनात उपमुख्यमंत्री अजित पवारांनी ‘प्रस्ताव पाठवा, लगेच मंजुरी देतो..’ अशी घोषणा केल्यानंतर वर्षभरात या स्मारकासंबंधी फाइलच पुढे सरकली नाही, हे अमळनेर व पर्यायाने खानदेशवासीयांचे दुर्दैवच म्हणावे लागेल.