Sanjay Gandhi Niradhar Yojana : निराधार योजनेंतर्गत लाभार्थ्यांच्या अर्थसहाय्यतेत वाढ

Sanjay Gandhi Niradhar Yojana Increase in financial assistance to beneficiaries nandurbar news
Sanjay Gandhi Niradhar Yojana Increase in financial assistance to beneficiaries nandurbar newssakal

Sanjay Gandhi Niradhar Yojana : संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तिवेतन योजनेंतर्गत सर्व लाभार्थ्यांच्या घोषणा अर्थसंकल्पीय अधिवेशनात करण्यात आल्या.

अर्थसहाय्यात हजार रुपयांवरून एक हजार ५०० रुपये इतकी वाढ करण्यात आली. त्याचप्रमाणे लाभार्थ्यांच्या मुलाची २५ वर्षे वयाबाबतची अट रद्द करण्यात आली आहे. त्यामुळे आता सबंध राज्यातील संजय निराधार गांधी योजनेच्या लाभार्थ्यांकरिता ‘अच्छे दिन’ येणार आहेत. (Sanjay Gandhi Niradhar Yojana Increase in financial assistance to beneficiaries nandurbar news)

संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तिवेतन योजनेंतर्गत पात्र लाभार्थ्यांना मिळणाऱ्या अर्थसहाय्यात वाढ करण्याबाबत लोकप्रतिनिधी, विविध दिव्यांग संघटना व स्वयंसेवी संस्था यांच्या माध्यमातून शासनाकडे वारंवार मागणी व पाठपुरावा करण्यात येत होता.

२०२३-२४ चा अर्थसंकल्प सादर करताना संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तिवेतन योजनेतील पात्र लाभार्थ्यांच्या अर्थसहाय्यात हजार रुपयांवरून एक हजार ५०० रुपये अशी वाढ करण्यात येत आहे.

त्याअनुषंगाने या योजनेंतर्गत पात्र लाभार्थ्यांना देण्यात येणान्या अर्थसहाय्यात वाढ करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. त्याअनुषंगाने २८ जून २०२३ च्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता मिळाल्यानुसार संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तिवेतन योजनेतील सर्व लाभार्थ्यांना देण्यात येत असलेल्या हजार रुपये इतक्या मासिक अर्थसहाय्यात ५०० रुपये इतकी वाढ करून अर्थसहाय्याची रक्कम दरमहा एक हजार ५०० रुपये करण्यास याद्वारे शासनाने मान्यता दिली आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Sanjay Gandhi Niradhar Yojana Increase in financial assistance to beneficiaries nandurbar news
PM Kisan Nidhi Yojana : प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेत ई-केवायसीचे आवाहन

त्यानुसार एक अपत्य किंवा चार अपत्ये असलेल्या विधवा लाभार्थ्यांनादेखील अर्थसहाय्याची रक्कम दरमहा एक हजार ५०० रुपये इतकी राहील, असा निर्णय घेण्यात आला. त्या संदर्भातील आदेश ५ जुलैला सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागातर्फे काढण्यात आला आहे. संजय गांधी निराधार योजनेतील लाभार्थ्यांच्या मानधनात वाढ व्हावी, अशी आमची पण प्रामाणिक इच्छा होती. त्या अनुषंगाने आम्ही मानधनवाढीबाबत मागणी करीत शासनाकडे पाठपुरावा सुरू ठेवला होता.

२७ जून २०२३ ला अपंग जनता दल सामाजिक संघटनेचे महाराष्ट्र राज्य प्रदेशाध्यक्ष आनंदा पाटील यांच्या नेतृत्वात मुंबई येथे मंत्रालयासमोर विविध मागण्यांसाठी मोर्चा काढण्यात आला होता. मानधन हजार रुपयांवरून तीन हजार करण्याची मागणी केली होती. अखेर हा मानधन वाढीचा निर्णय झाल्याने या मोर्चामुळे यश मिळाल्याने प्रदेशाध्यक्ष आनंदा पाटील यांना अपंग जनता दल सामाजिक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांकडून शुभेच्छा दिल्या जात आहेत.

Sanjay Gandhi Niradhar Yojana Increase in financial assistance to beneficiaries nandurbar news
PM Adi Gram Yojana : केंद्राकडून 155 कोटींचा निधी मंजूर; नंदुरबार लोकसभा मतदार संघातील 777 गावांना होणार लाभ

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com