Vidhan Sabha 2019 : राष्ट्रवादी-ओबीसी सेलचा जिल्हाध्यक्ष भाजपच्या तंबूत!

प्रा.भगवान जगदाळे
शनिवार, 12 ऑक्टोबर 2019

- साक्री येथील न्यू इंग्लिश स्कूलच्या मैदानावर सूर्यवंशी यांच्या प्रचारसभेदरम्यान हा पक्षप्रवेश सोहळा झाला.

निजामपूर-जैताणे (धुळे) : माळमाथा परिसरातील जैताणे (ता.साक्री) येथील माजी सरपंच, गटनेते, सरपंच संघटनेचे जिल्हा सरचिटणीस तथा राष्ट्रवादी ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष संजय खैरनार यांच्यासह तालुकाध्यक्ष नवल खैरनार, दहिते समर्थक तथा विद्यमान सरपंच ईश्वर न्याहळदे, तालुका काँग्रेस कमिटीचे खजिनदार लक्ष्मीकांत शहा यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत समर्थक व कार्यकर्त्यांसह नुकताच भाजपमध्ये प्रवेश केला.

साक्री येथील न्यू इंग्लिश स्कूलच्या मैदानावर सूर्यवंशी यांच्या प्रचारसभेदरम्यान हा पक्षप्रवेश सोहळा झाला. यावेळी पर्यटनमंत्री जयकुमार रावल, खासदार डॉ.सुभाष भामरे, डॉ.हिना गावित, इंजि.मोहन सूर्यवंशी, भाजपचे प्रांतिक सदस्य सुरेश पाटील, ऍड.संभाजी पगारे, भाजपचे जिल्हाध्यक्ष बबनराव चौधरी, तालुकाध्यक्ष संजय अहिरराव, ज्येष्ठ नेते शिवाजीराव दहिते, पोपटराव सोनवणे, शिवसेनेचे तालुका प्रमुख विशाल देसले, जिल्हा उपप्रमुख भुपेश शहा, तालुका संघटक पंकज मराठे, महिला आघाडीच्या जिल्हाप्रमुख कविता क्षीरसागर, डॉ.विजया अहिरराव, ऍड.पूनम काकुस्ते, लीला सूर्यवंशी आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.

जैताणेतील सामाजिक कार्यकर्ते प्रभाकर खैरनार, पंडित बाविस्कर, वासुदेव सूर्यवंशी, शांतीलाल भदाणे, ज्ञानेश्वर भदाणे, सुनील महाजन, हांडू जाधव, विठोबा न्याहळदे, संदिप भलकारे, पप्पू धनगर, विनोद धनगर, पावबा सूर्यवंशी, भूषण न्याहळदे, ज्ञानेश्वर मोरे आदी कार्यकर्त्यांनीही यावेळी भाजपात प्रवेश केला. राष्ट्रवादीचे संजय खैरनार, नवल खैरनार, काँग्रेसचे लक्ष्मीकांत शहा व ईश्वर न्याहळदे भाजपात दाखल झाल्याने माळमाथा परिसरातील राजकारणाला कलाटणी मिळाली आहे.

भाजप-शिवसेना महायुतीचे उमेदवार मोहन सूर्यवंशी यांना यानिमित्ताने बळकटी मिळणार आहे. जिल्हा सरचिटणीस वसंतराव बच्छाव, राजेंद्र खैरनार यांनी सूत्रसंचालन केले व आभार मानले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sanjay Khairnar join BJP Party Maharashtra Vidhan Sabha 2019