Nandurbar News : प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना 12 बलुतेदारांसाठी नवसंजीवनी : संजय गाते

State President of BJP OBC Morcha Sanjay sings while speaking at a meeting organized by BJP OBC Morcha.
State President of BJP OBC Morcha Sanjay sings while speaking at a meeting organized by BJP OBC Morcha.esakal
Updated on

Nandurbar News : केंद्र सरकारची प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना बारा बलुतेदार समाजासाठी नवसंजीवनी असून, आपले पारंपरिक व्यवसाय करण्यासाठी या योजनेद्वारे ओबीसी बांधवांना बळ मिळणार आहे. बारा बलुतेदार समाजबांधवांनी केंद्र सरकारच्या या योजनेद्वारे नाममात्र व्याजदराने कर्ज घेऊन आपला व्यवसाय वाढवावा, असे आवाहन भाजप ओबीसी मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष संजय गाते यांनी केले.(Sanjay singh statement of Pradhan Mantri Vishwakarma Yojana for 12 Balutedars nandurbar news)

येथील कन्यादान मंगल कार्यालयात भाजप ओबीसी मोर्चातर्फे मेळावा झाला. या वळी व्यासपीठावर भाजप ओबीसी मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष अविनाश माळी, भाजप जिल्हाध्यक्ष नीलेश माळी, हिरामण गवळी, भरत महाजन, श्यामकांत ईशी, आकाश अहिरे, भारती सोनवणे, काजल मछले, सरिता चौधरी, सपना अग्रवाल, नरेंद्र माळी, संतोष वसईकर, प्रवीण गुरव, लक्ष्मण माळी, भीमसिंग राजपूत आदी पदाधिकारी उपस्थित होते.

भाजप ओबीसी मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष अविनाश माळी यांनी प्रास्ताविक केले. कुंभार, माळी, सुतार, लोहार, नाभिक, धोबी, शिंपी, मिस्त्री यांच्यासह सर्व ओबीसी समाजबांधवांनी या योजनेचा लाभ घेऊन आपला व्यवसाय वाढवावा याबाबतची माहिती त्यांनी प्रास्ताविकातून दिली. ईश्वर साठे यांनी योजनेबाबत सविस्तर अर्ज कसा करावा, प्रशिक्षण कसे दिले जाईल याची माहिती दिली.

State President of BJP OBC Morcha Sanjay sings while speaking at a meeting organized by BJP OBC Morcha.
Nandurbar News : रेल्वेच्या खांबावर चढून एकाचा ठिय्या; मनोरुग्ण असल्याचा प्रशासनाचा अंदाज

नीलेश माळी, हिरामण गवळी यांनी केंद्र सरकार व राज्य सरकारच्या विविध योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले. केतन गिते यांनी सूत्रसंचालन केले. भाजप ओबीसी मोर्चाचे जिल्हाध्यक्ष जितेंद्र पगारे यांनी आभार मानले.

कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी मनोज माळी, दिनेश माळी, अक्षय माळी, दीपक महाजन, खुशाल चौधरी, जयेश चौधरी, नीरज जाधव, राहुल माळी, देवीदास माळी, विशाल महाजन, विनोद अहिरे, रमाशंकर माळी, मधुकर माळी, राजकुमार माळी यांनी प्रयत्न केले.

State President of BJP OBC Morcha Sanjay sings while speaking at a meeting organized by BJP OBC Morcha.
Nandurbar News : पशुधनाच्या वंध्यत्वाची तपासणी करून घ्यावी; जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त यांचे आवाहन

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com