
शहादा,(जि. नंदुरबार) - देशात सर्वदूर अश्वांच्या खरेदी-विक्रीसाठी प्रसिद्ध सारंगखेडा (ता. शहादा) येथील ऐतिहासिक यात्रोत्सवाला शनिवारी (ता.१४) श्री दत्तजयंती पासून सुरुवात झाली. महानुभाव पंथीयांचे श्रद्धास्थान असलेल्या येथील एकमुखी दत्ताच्या दर्शनासाठी शनिवारी पहाटेपासूनच पंचक्रोशीतील भाविकांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती.