सटाणा: संत शिरोमणी नामदेव महाराज यांचा ६६८ वा पुण्यतिथी सोहळा संपन्न

palkhi
palkhi

सटाणा - येथील श्री क्षत्रिय अहिर शिंपी समाज सेवा मंडळ ट्रस्टतर्फे श्री संत शिरोमणी नामदेव महाराज यांचा ६६८ वा पुण्यतिथी सोहळा आज गुरुवार (ता.९) रोजी शेकडो भाविक व समाजबांधवांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांसह श्री संत नामदेव महाराज यांच्या पालखी मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले होते. फुलांनी सजविलेल्या रथावरील संत नामदेवांची प्रतिमा हे प्रमुख आकर्षण ठरले.

पहाटे पाच वाजता येथील श्री संत शिरोमणी नामदेव महाराज मंदिरात भालचंद्र अहिरराव यांच्या हस्ते सपत्नीक महाराजांच्या मूर्तीचा अभिषेक व महापूजा करण्यात आली. सकाळी ९ वाजता समाजाचे शरद कापुरे यांच्या सपत्नीक हस्ते महाआरती करण्यात आली. यानंतर शिंपी समाज सेवा मंडळ ट्रस्ट, नवयुवक मंडळ व महिला मंडळाच्या पदाधिकाऱ्यांसह समाजबांधवांच्या उपस्थितीत पायी पालखी सोहळ्यास सुरुवात झाली. पालखी सोहळ्यात टाळ - मृदुंगाचा गजर व संत नामदेव महाराजांचा जयघोष करीत महालक्ष्मी माता मंदिर, कालिका माता मंदिर, व देवमामलेदार श्री यशवंतराव महाराज मंदिरमार्गे मिरवणूक निघाली. पालखीचे दर्शन घेण्यासाठी शहरवासीयांनी रस्त्याच्या दुतर्फा गर्दी केली होती. चौकाचौकात मिरवणूक येताच भाविक पालखीची पूजा करून दर्शन घेत होते. मिरवणुकीत ठिकठिकाणी भाविकांसह समाजबांधव सहभागी होत असल्याने मंगलमय वातावरण तयार झाले होते. देवमामलेदार श्री यशवंतराव महाराज मंदिर, न्यायालय, ग्रामीण रुग्णालय, मल्हार रोड, मुख्य बाजारपेठ, चावडी चौकमार्गे पालखी मिरवणूक अकरा वाजता श्री संत शिरोमणी नामदेव महाराज पोहोचली. यावेळी काल्याच्या कीर्तनाने मिरवणुकीचा समारोप करण्यात आला. 

यानंतर लाडशाखीय वाणी समाज मंगल कार्यालयात अखिल भारतीय शिंपी समाजाचे कार्याध्यक्ष रवींद्र बागुल यांच्या अध्यक्षतेखाली समाजबांधवांची बैठक घेण्यात आली. व्यासपीठावर ट्रस्ट अध्यक्ष शशिकांत सोनवणे, महिला जिल्हा उपाध्यक्षा सुरेखा तरटे, शहराध्यक्ष कामिनी निकुंभ, नाशिक जिल्हा युवक अध्यक्ष ललित खैरनार, तालुकाध्यक्ष स्वप्नील जाधव, शहराध्यक्ष संदीप सोनवणे, छगन निकुंभ, दत्तात्रेय कापुरे, नितीन बिरारी, खंडेराव जाधव, दिलीप खैरनार, चंद्रकांत निकुंभ, शरद कापुरे, सतीश चव्हाण, मोहन कापडणीस, प्रकाश खैरनार आदी उपस्थित होते. बैठकीत ट्रस्ट अध्यक्षपदी शशिकांत सोनवणे, महिला अध्यक्षपदी कामिनी निकुंभ, युवक अध्यक्षपदी संदीप सोनवणे यांची फेरनिवड तर प्रीती कापुरे यांची युवती अध्यक्षपदी सर्वानुमते निवड करण्यात आली. यावेळी कार्याध्यक्ष रवींद्र बागुल यांनी शिक्षण दत्तक पालक, निराधार महिला अशा विविध योजना मध्यवर्ती संस्थेतर्फे राबविण्याचा मनोदय व्यक्त केला. शशिकांत सोनवणे यांनी समाजाच्या मंगल कार्यालयासाठी मदत करण्याचे आवाहन केले. 

कार्यक्रमास दीपक नंदाळे, जयेश सोनवणे, राजेंद्र सावळे, संजय खैरनार, वैभव बोरसे, समको संचालक दिलीप चव्हाण, दिगंबर निकुंभ, बाळासाहेब चव्हाण, मुख्याध्यापक पी. सी खैरनार, संदीप अहिरराव, हरी तरटे, विनायक बोरसे, सुनिता ईसइ, दिपाली खैरनार, ज्योती खैरनार, जयश्री खैरनार, शाम कापुरे, निंबा जगताप, मनोज निकुंभ आदींसह शेकडो समाजबांधव उपस्थित होते. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com