Jalgaon News : सातपुडा जंगल सफारीचा शुभारंभ; पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले भावनिक आवाहन
Inauguration of Satpuda Jungle Safari by Guardian Minister : जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी रावेर तालुक्यातील पाल येथे 'सातपुडा जंगल सफारी'चे उद्घाटन केले. या वेळी आमदार अमोल जावळे, उपवनसंरक्षक जमीर शेख आणि इतर अधिकारी उपस्थित होते. उद्घाटनानंतर मंत्री पाटील यांनी स्वतः सफारीचा अनुभव घेतला.
जळगाव: ‘सातपुडा जंगल सफारी’ हा ग्रामीण विकास आणि पर्यावरण संवर्धनाचा अभिनव संकल्प आहे. या माध्यमातून स्थानिक तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील. ही केवळ सफारी नाही, तर सातपुड्याचा आत्मा जपणारी संस्कृती आहे. पाल परिसराला नवा चेहरा मिळणार आहे.