Success Story : रिक्षाचालकाचा मुलगा करणार देशाचे संरक्षण..! जिद्द अन् चिकाटीच्या जोरावर सैन्यदलात निवड | Saurabh Mali selected in army success story nandurbar news | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Saurabh Mali selected in army success story nandurbar news

Success Story : रिक्षाचालकाचा मुलगा करणार देशाचे संरक्षण..! जिद्द अन् चिकाटीच्या जोरावर सैन्यदलात निवड

Nandurbar News : परिस्थितीची जाणीव डोळ्यासमोर ठेवत जिद्द अन् चिकाटी कायम ठेवल्यास कोणत्याही क्षेत्रात मनुष्य अपयशी ठरत नाही हे कळंबू (ता. शहादा) येथील सौरभ राजेंद्र माळी याने वयाच्या २३ व्या वर्षी सैन्यदलात भरती होऊन इतर तरुणांना व समाजाला सिद्ध करून दाखविले. (Saurabh Mali selected in army success story nandurbar news)

कळंबू येथील राजेंद्र लक्ष्मण माळी (कळंबू, ह.मु सुरत) यांचा मुलगा सौरभ माळी याची नुकतीच सैन्यदलात निवड झाली. सौरभचे वडील राजेंद्र माळी सुरत येथे रिक्षाव्यवसाय करून कुटुंबाचा उदरनिर्वाह भागवितात, तर सौरभने काका श्यामराव माळी यांच्या मार्गदर्शनाने कळंबू येथे चौथी ते बारावीचे शिक्षण पूर्ण केले.

त्यानंतर सौरभला लहानपणापासून सैन्यदलात भरती होण्याची आवड असल्याने त्याने धुळे येथील महाराष्ट्र डिफेन्स ॲकॅडमीत प्रवेश घेऊन, विविध भरतीप्रक्रियेत सहभाग घेतला. पाच वर्षांपासून इंडियन नेव्हीत मेडिकलमध्ये दोन वेळा लेखी परीक्षेत फिटनेसअभावी अपयश आले.

रेल्वे खात्याच्या विविध परीक्षांत पाच वेळा अनुत्तीर्ण अशा विविध परीक्षांत वारंवार अपयश आल्यावरही खचून न जाता जिद्द व चिकाटीच्या जोरदार सैन्यदलात भरती होण्याचे स्वप्न साकार केल्याने त्याचे गावातून कौतुक करण्यात येत आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

"माझ्या यशाचे खरे श्रेय माझा सर्व कुटुंबाला मिळते. आयुष्य घडविण्यासाठी खूप अडचणी निर्माण झाल्या. मात्र वडील, काका, यांचा पाठिंबा व माझ्या जिद्दीने सर्व अडचणींवर मात करून उशिरा का होईना मात्र कष्टाला फळ मिळाले आहे." -सौरभ राजेंद्र माळी

ग्रामपंचायत व ग्रामस्थांकडून कौतुक

सौरभची भारतीय सैन्यदलात निवड झाल्याची वार्ता गावभर पसरली अन् सर्वांकडून अभिनंदन व शुभेच्छाचा वर्षाव सौरभवर झाला. या वेळी येथील ग्रामपंचायत कार्यालयात जाहीर सत्कार करण्यात आला. सरपंच आर. आर. बोरसे, उपसरपंच योगीराज बोरसे, ग्रामविकास अधिकारी अनिल ठाकरे, माजी सरपंच प्रवीण वाघ, ग्रामपंचायत सदस्य देवीदास कुवर, ग्रामस्थ व मित्रपरिवार उपस्थित होता.

माळी समाजाकडून सत्कार

येथील माळी समाज भवनात सौरभचा समाजातर्फे शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. या वेळी माळी समाजाचे वरिष्ठ साहेबराव गायकवाड, प्रवीण वाघ, संजय महाले, रितेश बोरसे, रवींद्र देवरे, पांडुरंग सोनवणे, प्रशांत जाधव, राहुल सोनवणे, गोरख माळी, इंद्रजित देवरे व मित्रपरिवार उपस्थित होता.