Jalgaon News : अफवेचा परिणाम! हरियाणातील जडीबुडी विक्रेत्यांवर गावकऱ्यांचा हल्ला

Herbal Sellers Mistaken as Child Abductors in Savda : हरियानामधील साधूंच्या वेशातील जडाबुटी विक्रेत्यांना मुंजलवाडी, कुसुंबा व लोहारा येथील ग्रामस्थांनी बेदम मारहाण करीत त्यांच्या गाडीची तोडफोड केल्याची घटना घडली.
Jalgaon
Jalgaonsakal
Updated on

सावदा (ता. रावेर)- मुले चोरणाऱ्या टोळीच्या संशयातून हरियानामधील साधूंच्या वेशातील जडाबुटी विक्रेत्यांना मुंजलवाडी, कुसुंबा व लोहारा (ता. रावेर) येथील ग्रामस्थांनी बेदम मारहाण करीत त्यांच्या गाडीची तोडफोड केल्याची घटना रविवारी (ता. २०) सकाळी आठच्या सुमारास घडली. घडलेल्या घटनेची माहिती समजताच सावदा पोलिसांनी गावात धाव घेतल्याने अनर्थ टळला. जडीबुडी विकणाऱ्यांच्या गाडीचा लोहारा येथील युवकाला धक्का लागल्याने तो जखमी झाला असून, याप्रकरणी परस्परविरोधी तक्रारीवरून सावदा पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com