जळगाव- सामाजिक, पर्यावरण क्षेत्रात काम करणाऱ्या कार्यकर्त्यांची मोहीम किती प्रभावी ठरू शकते अन् ती एखादे मोठे आव्हान पेलू शकते, याचा प्रत्यय नुकताच आला. पक्षी निरीक्षणासाठी जळगावहून बहुळा धरणावर गेलेल्या पक्षीमित्रांनी धरणाच्या काठावर जमलेल्या कचऱ्याच्या ढिगाऱ्यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करीत ‘सेव्ह कृष्णासागर जलाशय’ मोहीम राबवत स्वच्छतेची साद घातली अन् त्याची दखल घेत धर्माधिकारी प्रतिष्ठानने हा काठ स्वच्छ करून या मोहिमेस सकारात्मक प्रतिसाद दिला.