शाळा बंदच्या निर्णयाने आदिवासी, दलित, भटक्या मुलांचे शिक्षण थांबेल - चासकर

yeola
yeola

येवला : शाळा बंद करण्याचा निर्णय महात्मा फुलेंना अपेक्षीत शिक्षणाला अन कल्याणकारी राज्याच्या संकल्पनेला बाधा आणणारा असंविधानिक आहे. याने डोंगरदर्‍यांतल्या वाड्या-वस्त्यांवरील सरकारी शाळा बंद केल्या तर आदिवासी, दलित, भटक्या समाजातील गोरगरीब मुलांचे शिक्षण थांबेल. शाळाबाह्य मुलाची संख्या प्रचंड वाढेल. कंपनी करणामुळे महाग झालेले शिक्षण बहुजनांना परवडणार नाही, अशी भीती महाराष्ट्र राज्य शिक्षण बचाव कृती समितीचे समन्वयक भाऊसाहेब चासकर यांनी व्यक्त केली.

येथील उपक्रमशील प्राथमिक शिक्षक नानासाहेब कुर्‍हाडे लिखीत शिक्षण प्रवाह व दृष्टिकोण या पुस्तकांच्या प्रकाशन सोहळ्यात चासकर बोलत होते.मंगळवारी येथील नाट्यगृहात झालेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रवादीचे नेते ऍड. माणिकराव शिंदे होते. प्रमुख पाहुणे म्हणून माजी आमदार मारोतराव पवार, सहाय्यक संचालक दिलीप गोविंद, मुक्त विद्यापीठाच्या संचालिका डॉ. संजीवनी महाले, जेष्ठ साहित्यीक गो. तु. पाटील, नगराध्यक्ष बंडू क्षीरसागर, गटविकास अधिकारी सुनील आहिरे, डॉ. भाउसाहेब गमे, डॉ. जिभाउ मोरेे, अर्जून कोकाटे, नगरसेवक प्रविण बनकर, डॉ. सुरेश कांबळे, पंचायत समिती सदस्य प्रविण गायकवाड, डॉ. किशोर पहिलवान, बबनराव साळवे, सुहास अलगट, अक्षरबंध प्रकाशनचे प्रविण जोंधळे, रामदास वाघ, वाल्मिकराव कुर्‍हाडे, सुमन कुर्‍हाडे, भास्कर लोहकरे आदी उपस्थित होते.या सर्वांच्या हस्ते या दोन्ही पुस्तकांचे प्रकाशन करण्यात आले.

आजवर सरकारी शाळांतल्या शिक्षकांनी स्वतःचे अनुभव ग्रंथित न केल्याने शिक्षणाच्या इतिहासाचे दस्ता ऐवजीकरण (डॉक्यूमेंटेशन) होऊ शकलेले नाही. अलिकडच्या काळात प्राथमिक शिक्षक आपले अनुभव, चिंतन, उपक्रम यांविषयी अभिव्यक्त होत आहेत. त्यादृष्टीने नानासाहेब कुर्‍हाडे यांचे लेखन प्रयत्न स्तुत्य आहेत, त्यांचे स्वागत केले पाहिजे. त्यांच्याकडून शिक्षकांनी लिहिण्याची प्रेरणा घ्यायला हवी, असे मत चासकर यांनी व्यक्त केले.

यावेळी माजी आमदार मारोतराव पवार म्हणाले की, पूर्वी पासून शिक्षक समाजाचा आदर्श होता. आजच्या शिक्षकांत अमूलाग्र बदल झाले आहे. तरी सुध्दा शिक्षक आजही आदर्श आहे, असे सांगितले.  प्रा. गो. तु. पाटील यांनी लेखन कार्य हे व्रत आहे. त्याचे पालन करावे. येवल्याच्या साहित्य क्षेत्रात नानासाहेब कुर्‍हाडे यांचे स्वागत केले. सहाय्यक शिक्षण उपसंचालक दिलीप गोविंद यांनी शिक्षण प्रवाह आणि दृष्टिकोण या पुस्तकात मांडलेले विचार शिक्षकांना दिशादर्शक आहेत असे सांगितले.  या कार्यक्रमास माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी पाठविलेल्या शुभेच्छा पत्राचे वाचन ऍड. शिंदे यांनी केले. मुक्त विद्यापीठाच्या डॉ. संजीवनी महाले या म्हणाल्या की, कुर्‍हाडे विद्यार्थ्यांप्रती प्रचंड जिव्हाळा असणारा शिक्षक अन त्याच्या हातून अशा प्रकारची साहित्य कलाकृती निर्माण व्हावी ही बाब शिक्षण क्षेत्राताला अभिमानास्पद आहे.
प्रास्ताविक प्रविण जोंधळे यांनी केले.

सूत्रसंचालन नवनाथ सुडके यांनी तर आभार अर्जून कोकाटे यांनी मानले.भागवतराव सोनवणे, विस्तार अधिकारी मंदाकिनी लाडे, केंद्र प्रमुख निंबा केदारे, मधुकर चव्हाण, विमल शिंदे, ज्ञानेश्‍वर गायकवाड,तालुका शिक्षक समन्वय समितीचे बाजीराव सोनवणे, बाबासाहेब पवार, शांताराम काकड, भाऊसाहेब साळवे, नानासाहेब गोराणे, दिपक थोरात, बाळासाहेब आहेर, भारत कानडे, सुनील गिते, रतन पिंगट, गोकुळ वाघ, रमेश खैरणार, रणजित परदेशी, राजेंद्र ठोंबरे, सुंदर हारदे आदी उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com