खानदेशात समता परिषदेच्या जिल्हाध्यक्षपदी निवडी!

प्रा.भगवान जगदाळे
सोमवार, 5 नोव्हेंबर 2018

निजामपूर-जैताणे (धुळे) : अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या धुळे जिल्हाध्यक्षपदी राजेश बागुल (जैताणे ता.साक्री), नंदुरबार जिल्हाध्यक्षपदी राजेंद्र वाघ (सोनवद ता.शहादा), जळगाव जिल्हाध्यक्षपदी सतीश महाजन (टाकळी प्र. चाळीसगाव), तर कार्याध्यक्षपदी वसंत पाटील यांची रविवारी (ता.4) निवड झाली. नुकतेच माजी उपमुख्यमंत्री तथा समता परिषदेचे संस्थापक अध्यक्ष छगन भुजबळ यांच्या हस्ते त्यांना नियुक्तीपत्र देण्यात आले. ह्या नेमणुका पाच वर्षांसाठी आहेत.

गेल्या अनेक दिवसांपासून जिल्हाध्यक्ष पदासाठी कार्यकर्त्यांनी फिल्डिंग लावली होती. काल (ता.4) माजी मंत्री छगन भुजबळ शहादा (जि.नंदुरबार) व सोनगीर (जि.धुळे) येथे फुले दाम्पत्य पुतळा अनावरण व समता मेळाव्यासाठी आले होते. त्याप्रसंगी ही नियुक्तीपत्रे देण्यात आली. गेल्या पाच वर्षांपासून राजेश बागुल हे समता परिषदेचे साक्री तालुकाध्यक्ष होते. तर राजेंद्र वाघ हे शहादा तालुकाध्यक्ष होते.

धुळे, नंदुरबार व जळगावचे जिल्हाध्यक्ष अनुक्रमे देवेंद्र पाटील, अशोक माळी व डॉ. प्रताप महाजन यांनी नुकताच भाजपमध्ये प्रवेश केल्याने खानदेशात समता परिषदेला खिंडार पडल्याचे मानले जात होते. त्या पार्श्वभूमीवर तडकाफडकी ह्या नियुक्त्या करण्यात आल्या. धुळे जिल्हाध्यक्ष पदासाठी आर.के.माळी (सोनगीर), पिंटू माळी (शिरपूर), राजेंद्र तावडे (चौगाव), प्रकाश शिरसाठ (पिंपळनेर) हेही इच्छुक होते.

आगामी काळात जिल्हा व तालुका कार्यकारिणीसह जिल्हा उपाध्यक्ष, कार्याध्यक्ष, सरचिटणीसपदी व धुळे, साक्री, शिरपूर, शिंदखेडा या चारही तालुक्यांच्या तालुकाध्यक्षपदी नेमकी कुणाची वर्णी लागते? याकडेही कार्यकर्त्यांचे लक्ष लागून आहे. नवनिर्वाचित जिल्हाध्यक्षांचा विविध राजकीय, सामाजिक संघटना व समर्थक, कार्यकर्त्यांनी सत्कार केला. यापूर्वी जैताणे (ता.साक्री) येथीलच दिवंगत सामाजिक कार्यकर्ते गोकुळ माळी यांना जिल्हा उपाध्यक्षपदी संधी मिळाली होती. त्यानंतर राजेश बागुल यांना जिल्हाध्यक्षपदी संधी मिळाल्याने समर्थकांनी विशेष आनंद व्यक्त केला आहे.

Web Title: Selection of District President of Samata Parishad