राज्यस्तरीय खो-खो स्पर्धेसाठी कन्या शाळेच्या संघाची निवड 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 14 ऑक्टोबर 2019

सतरा वर्षांखालील मुलींच्या नाशिक विभागीय आंतरशालेय खो-खो स्पर्धेतील अंतिम फेरीत शासकीय कन्या शाळेच्या संघाने अनुदानित आश्रमशाळा, अलंगुणचा पराभव केला. हिंगोली येथे होणाऱ्या राज्य शालेय खो-खो स्पर्धेसाठी या संघाची निवड झाल्याने नाशिक विभागाचे ते प्रतिनिधित्व करणार आहे. 

नाशिक : सतरा वर्षांखालील मुलींच्या नाशिक विभागीय आंतरशालेय खो-खो स्पर्धेतील अंतिम फेरीत शासकीय कन्या शाळेच्या संघाने अनुदानित आश्रमशाळा, अलंगुणचा पराभव केला. हिंगोली येथे होणाऱ्या राज्य शालेय खो-खो स्पर्धेसाठी या संघाची निवड झाल्याने नाशिक विभागाचे ते प्रतिनिधित्व करणार आहे. 

विभागातील सहा संघ सहभागी

स्पर्धेत नाशिक विभागातील सहा संघ सहभागी झाले होते. स्पर्धेत शासकीय कन्या शाळेने आपल्या लौकिकाला साजेसा खेळ करत एकतर्फी विजय मिळवला. उपांत्य फेरीच्या पहिल्या सामन्यात मालेगाव संघाचा 1 डाव 11 गुणांनी एकतर्फी पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला. अंतिम सामन्यात अलंगुणचा एक डाव सहा गुणांनी पराभव करत स्पर्धेतील विजेतेपद पटकावले. विजयी संघाला श्रीयोग बिल्डर्सचे संचालक बी. एम. काळे यांनी पुरस्कृत केले होते. विजयी संघात राष्ट्रीय खेळाडू निशा वैजल व मनीषा पडेर या दोन खेळाडूंचा समावेश होता. विजयी संघाचे नेतृत्व कौसल्या पवारने केले. त्यांना वृषाली भोये, दीदी ठाकरे, रूपाली मेढे, गौरी बोरसे, नर्मदा भवर, सोनाली हडळ, विद्या मिरके, नामिषा भोये, सीता दिवा यांनी आपल्या संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. हा संघ जिल्हा क्रीडाधिकारी कार्यालयामार्फत खो-खो संघटनेच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी स्टेडियम येथे दैनंदिन सराव करतो. राणी लक्ष्मी स्मारक समितीच्या राणी भवन येथे खेळाडूंची निवास व्यवस्था आहे. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Selection of a girls school team for the state-level kho-kho tournament