कोरोना लक्षणांच्या पार्श्‍वभूमीवर स्वतंत्र ओपीडी

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 24 मार्च 2020

जळगाव जिल्ह्यात कलम-144 लागू होऊन लॉक डाऊन केल्याने जिल्हा रुग्णालयातील नियमित रुग्ण तपासणीची संख्येत प्रचंड कमतरता आली आहे. जिल्ह्यात आज अखेर एकही कोरोना बाधित (पॉझिटिव्ह) रुग्ण अद्याप आढळून आलेला नसून आजवर जिल्हा रुग्णालयाच्या माध्यमातून 29 नमुने तपासणी साठी पाठवण्यात आले होते, त्यापैकी 21 निगेटिव्ह असून 6 नमुन्यांचा अहवाल अद्याप प्राप्त झालेला नाही. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशान्वये रुग्णालयातील संक्रमणाचा संशय असलेल्या रुग्णांसाठी नव्याने कोरोना वॉर्ड स्थापण्यात आला असून आवारातच नेत्ररुग्णालयाच्या इमारतीत या रुग्णांना ठेवण्यात येत आहे. 

 जळगाव :- सामान्य रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात कोरोना(कोव्हीड-190) संक्रमाणाचा संशय असलेल्या रुग्णांसाठी स्वतंत्र कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. सिव्हीलच्या आवारातील नेत्ररुग्णालयात हि व्यवस्था करण्यात आली असून ताप सर्दि पडसे आणि घशाच्या आजारांचे लक्षणे असणाऱ्या रुग्णांची ओपीडीही स्वतंत्र ठेवण्यात आली आहे. अशा 190 रुग्णांवर आज उपचार करण्यात आले आहेत. चोपडा येथील मूळ रहिवासी आणि कोरोना संसर्ग झालेल्याच्या निकटच्या संपर्कातील एका 24 वर्षीय तरुण दाखल झाला असून त्याचे नमुने संकलीत करून तपासणीला पाठवण्यात आले आहे. 

जळगाव जिल्ह्यात कलम-144 लागू होऊन लॉक डाऊन केल्याने जिल्हा रुग्णालयातील नियमित रुग्ण तपासणीची संख्येत प्रचंड कमतरता आली आहे. जिल्ह्यात आज अखेर एकही कोरोना बाधित (पॉझिटिव्ह) रुग्ण अद्याप आढळून आलेला नसून आजवर जिल्हा रुग्णालयाच्या माध्यमातून 29 नमुने तपासणी साठी पाठवण्यात आले होते, त्यापैकी 21 निगेटिव्ह असून 6 नमुन्यांचा अहवाल अद्याप प्राप्त झालेला नाही. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशान्वये रुग्णालयातील संक्रमणाचा संशय असलेल्या रुग्णांसाठी नव्याने कोरोना वॉर्ड स्थापण्यात आला असून आवारातच नेत्ररुग्णालयाच्या इमारतीत या रुग्णांना ठेवण्यात येत आहे. 

खासगी डॉक्‍टर घेईनात.. 
संचारबंदी आणि रुग्णालयातील रुग्ण संख्या पाहता खासगीतील डॉक्‍टरांकडून रुग्णांना नाकारण्याच्या तक्रारी येऊ लागल्या आहे. सर्दी खोकला,तापाचे लक्षण असलेल्या रुग्णांना ग्रामीण भागात उपचारासाठी सोय नसल्याने अडचणी येत आहे. पुणे-मुंबई सह बाहेरील राज्यातून आलेल्या आणि बाधीत असल्याची शक्‍यता असणाऱ्या रुग्णांना खास करून या अडचणींचा सामना करावा लागत आहे. 

ओपीडीही स्वतंत्र.. 
वैद्यकीय महाविद्यालयात अधिष्ठाता कार्यालया समोरच लॅबरोटरीज्‌ इमारतीत सर्दी-पडसे ताप आणि कोरोना बाधीतांप्रमाणे लक्षणे असणाऱ्या रुग्णांसाठी स्वतंत्र ओपीडीची सोय करण्यात आल्याचे अधिष्ठाता डॉ.भास्कर खैरे यांनी सकाळ शी बोलतांना सांगितले. 

कोरोना बाधित अपडेट्‌स 
नवीन संशयित रुग्ण :-01 
तपासणी झाले संशयित :-29 
तपासणीत निगेटिव्ह रुग्ण:- 21 
रिजेक्‍टेड नमुने 02 
प्रतीक्षेतील नमुने :-06 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: sepret opd for corona suspected in jalgaon civil