Dhule News : गावगुंडांचा बंदोबस्त व्हावा; महिलांची मागणी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

 gangs should be done Women demande

Dhule News : गावगुंडांचा बंदोबस्त व्हावा; महिलांची मागणी

धुळे : शहरातील पश्‍चिम देवपूर पोलिस ठाणे हद्दीत इंदिरानगर भागात गावगुंडांचा त्रास वाढला असून, ते दारू प्राशनानंतर परिसरात अनैतिक कृत्य करतात.

मोबाईलवर (Mobile) मोठ्याने गाणे वाजवून शिवीगाळ करतात. (Settlement of village gangs should be done Women demanded to District Superintendent of Police dhule news)

त्यास विरोध करणाऱ्या महिलांसह नागरिकांना शिवीगाळ, दमदाटी केली जाते. कायदा व सुव्यवस्थेला आव्हान देऊन सार्वजनिक शांतता भंग करणाऱ्या संबंधित गावगुंडांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी इंदिरानगर भागातील महिलांनी जिल्हा पोलिस अधीक्षक संजय बारकुंड यांच्याकडे केली.

इंदिरानगर भागातील काही महिलांसह नागरिकांनी जिल्हा पोलिस अधीक्षकांना निवेदन दिले. त्यात म्हटले आहे, की इंदिरानगरात असलेल्या दोन मंदिरांलगत काही गावगुंड रोज दारू पितात व आडोशाला अनैतिक कृत्य करतात.

हेही वाचा : अल्पमतातील निवाडे आणि सामान्य माणूस

मोबाईलवर मोठ्या आवाजात गाणे वाजवून शिवीगाळ करतात. आजूबाजूच्या महिलांसह नागरिकांनी हटकले तर तर शिवीगाळ, मारहाण केली जाते. सर्व गावगुंडांचे चेहरे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले असून, त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी ज्योती बोरसे, देवकाबाई मिस्तरी, मंगलबाई निकम, निर्मलाबाई पाटील, सुनीता पाटील, सुरेखाबाई हिरे,

मायाबाई पसारे, लतिका अहिरे, प्रेरणा देसाई, सुरेखा पाटील, संगीता चौधरी, मनीषा मिस्तरी, जयश्री चौधरी, ज्योत्स्ना दुसाने, छाया अहिरराव, सुवर्णा शार्दुल, सुमनबाई देवरे, कल्पनाबाई पाटील, संगीता बोरसे, सरला चौधरी, सोनी बोरसे, संगीता वाघ, मंगला देवरे यांनी केली.