Dhule News : शिंदखेडा नगरपंचायतीचा कारभार दोनच अधिकाऱ्यांवर; शहराचा विकास खुंटला

नगरपंचायतीचा भार दोनच अधिकाऱ्यांवर असून, शहराचा विकास खुंटल्याचे चित्र निर्माण झाले आहे.
Shindkheda Nagar Panchayat.
Shindkheda Nagar Panchayat.esakal

Dhule News : येथील नगरपंचायतीचा भार दोनच अधिकाऱ्यांवर असून, शहराचा विकास खुंटल्याचे चित्र निर्माण झाले आहे. नगरपंचायतीत आठ पदे असून, त्यात सहा पदे रिक्त आहेत. प्रशासकीय अधिकारी व पाणीपुरवठा अधिकारी सध्या हे दोनच अधिकारी कार्यरत आहेत. या रिक्त जागा केव्हा भरणार, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

प्रशासकीय अधिकारी म्हणून सचिन वाघ, तर पाणीपुरवठा अभियंता म्हणून विपुल साळुंखे काम पाहत आहेत. शहरात नागरी सुखसोयी पुरविण्याचे काम नगरपंचायतीच्या माध्यमातून होत असते. (Shindkheda Nagar Panchayat is managed by only two officers development of city was stunted dhule news)

शहरांमध्ये पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करणे, सार्वजनिक आरोग्याची व्यवस्था करणे, गावातील सांडपाणी, दिवाबत्तीची व्यवस्था करणे, जन्म-मृत्यू नोंद करणे, राज्य शासनाने वेळोवेळी सोपविलेले कार्य पार पाडणे, आधी सुखसुविधा त्या-त्या विभागातल्या नेमलेल्या अधिकाऱ्यांच्या माध्यमातून, तसेच शहरातील नागरिकांनी निवडून दिलेल्या नगरसेवक या समस्या सोडवत असतात.

परंतु गेल्या वर्षभरापासून नगरपंचायतीची मुदत संपल्याने आता नगरपंचायतीचा सर्व कारभार प्रशासकाकडे गेलेला आहे. नगरपंचायतीत बांधकाम अभियंता, पाणीपुरवठा अभियंता, स्वच्छता निरीक्षक, लेखापाल, लेखापरीक्षक, कर निरीक्षक, प्रशासकीय अधिकारी, सहाय्यक कर निरीक्षक ही आठ पदे मंजूर आहेत.

प्रशासकीय अधिकाऱ्यांना कर निरीक्षक व सहाय्यक कर निरीक्षक यांचा अतिरिक्त कारभार आहे. तसेच पाणीपुरवठा अधिकारी यांच्याकडे बांधकाम विभाग याचा अतिरिक्त कारभार सोपविण्यात आलेला आहे.

Shindkheda Nagar Panchayat.
Dhule ZP News : धुळे जिल्ह्याला 13 कोटींचा निधी प्राप्त; जिल्हा परिषदेतर्फे 451 योजनांचे उद्दिष्ट

दोनच अधिकारी काम पाहत असल्याने शहरातील स्वच्छता, दिवाबत्ती तसेच पाणीपुरवठ्याचे नियोजन कोलमडल्याचे चित्र दिसत आहे. गेल्या वर्षभरापासून सत्ताधारी नाहीत अन् विरोधकही नाहीत आणि आता तर अधिकारीही नाही अशी स्थिती निर्माण झाली आहे

पाणीयोजना, भाजीपाला मार्केट परिस्थिती ‘जैसे थे’

एकवीस कोटी रुपये खर्चाच्या कायमस्वरूपी पाणीपुरवठा योजनेचे काम दोन वर्षांपासून अंतिम टप्प्यात आलेले असून, आजतागायत स्थिती ‘जैसे थे’ची दिसत आहे. शहरातील काही भागांतील पाणी समस्या, दिवाबत्ती इत्यादी समस्या निर्माण झालेल्या आहेत.

नवीन पाणीपुरवठा योजना, नवीन भाजीपाला मार्केट, रस्ते, गटारी इत्यादी समस्यांचे चित्र ‘जैसे थे’ आहे. याबाबत प्रशासक व प्रशासनाकडून हालचाली होताना दिसत नाहीत.

Shindkheda Nagar Panchayat.
Dhule News : मंत्रालयाकडून 716 कोटींची निविदा मंजूर; रूळकामास लवकरच सुरवात

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com