शिंदखेडा- शहरापासून आठ किलोमीटर अंतरावरील दसवेल फाट्याजवळ शिंदखेडा- नाशिक बसमध्ये स्टार्टरची वायर जळाल्याने त्याजवळ असलेल्या पाईपला आग लागून धूर निघाल्याने प्रवाशांमध्ये एकच गोंधळ उडाला. बसमधील प्रवाशांनी गाडीच्या मागील बाजूस असलेली काच फोडण्याचा प्रयत्न केला. बसमधील ८० ते ९० प्रवाशांना सुखरूप खाली उतरविण्यात आल्याने पुढील अनर्थ टळला.